मीना हॅरिस यांना व्हाईट हाऊस कडून समज

मीना हॅरिस यांना व्हाईट हाऊस कडून समज

मीना हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती असलेल्या कमला हॅरिस यांच्या पुतणीला अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. कमला हॅरिस यांच्या नावाचा वापर स्वतःच्या ब्रँड निर्मीतीसाठी करू नये असा दम व्हाईट हाऊसच्या कायादेतज्ञांकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ

मीना हॅरिस या कमला हॅरिस यांची पुतणी आहेत. मीना हॅरिस यांचा स्वतःचा लाईफस्टाईल ब्रँड आहे. त्याबरोबरच अमेरिकेतील निवडणूकीच्या काळात कमला हॅरिस यांच्या प्रतिनिधी म्हणूनही मीना यांनी धुरा सांभाळली होती. काहिंच्या मते मीना यांना अनावश्यक प्रसिद्धी या काळात मिळाल्याने त्याचा गैरवापर त्या स्वतःच्या ब्रँडसाठी करत आहेत.

मीना हॅरिस यांची विविध उत्पादने आहेत. त्यात विविध कारणांसाठी छापले जाणारे टी-शर्ट, स्वेट शर्ट यांचा समावेश होतो. त्यांनी कमला हॅरिस यांच्या नावाचे विविध शर्ट वगैरे छापून स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला होता. ही उत्पादने सामान्यतः अमेरिकेती विविध सेलिब्रेटींतर्फे देखील वापरली जातात. त्यामुळे कमला हॅरिस यांच्या नावाचा वापर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मीना हॅरिस यांची वर्तणुक कायदेशीर दृष्ट्या चूक नसली तरी नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. आपल्या नातलगांच्या नावाचा केला जात असलेला वापर ही गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे. त्यामुळे व्हाईट हाऊस कडून कमला यांच्या नावाचा वापर कुठल्याही उत्पादनावर न करण्याची सुचना करण्यात आली आहे.

Exit mobile version