महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर आता आगामी काळातील अधिवेशनासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. त्यात शिवसेनेच्या सगळ्या ५६ आमदारांसाठी व्हीप काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटले आहे की, सर्व आमदारांना विधिमंडळात उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावण्यात येणार आहे. हा व्हिप शिवसेनेच्या सगळ्या ५६ आमदारांना मान्य करावा लागणार आहे. या व्हिपचे उल्लंघन झाले तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
शिवसेना नाव आणि चिन्ह वापरून जे कुणी निवडून आले आहेत त्यांना हा व्हिप लागू होईल आणि त्यांना तो मान्य करावा लागेल, असे गोगावले यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
लढाई शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
बागेश्वर धाममध्ये इतकी लोक आले पुन्हा हिंदू धर्मात
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, दोन गट आहेत. त्यामुळे त्यांचा व्हिप आम्हाला लागू होणार नाही. आमचा गट वेगळा आहे. दोन्ही गटांना मान्यता दिली असून त्यांना दोन वेगवेगळी चिन्हे आणि नावेही देण्यात आली आहेत.
मूळ नाव आणि चिन्ह कुणाचं त्याचा निर्णय आयोगाला देण्याचा अधिकार नाही. पण तरीही त्यांनी तो निर्णय दिला त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे त्यांच्या व्हिपचा आणि आमचा संबंध नाही.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना देण्यात आल्यानंतर याच चिन्ह आणि नावावर निवडणूक लढविलेल्या आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे काय होणार हा प्रश्न आहे. त्यांना शिंदे यांच्याकडून बजावण्यात आलेला व्हीप मान्य करावा लागेल का, की ते स्वतंत्र गट आहेत याविषयी आता संभ्रम आहे.