काँग्रेस अडचणीत असताना राहुल गांधी सुट्टीवर परदेशात

काँग्रेस अडचणीत असताना राहुल गांधी सुट्टीवर परदेशात

देशभरात कॉंग्रेसला अनेक धक्के बसत असून, अनेक कॉंग्रेसचे बडे नेते कॉंग्रेसला सोडून इतर पक्षात जात आहेत. मात्र कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उन्हाळी सुट्टीसाठी परदेशात रवाना झाले आहेत.

एकीकडे पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते २०२४ लोकसभा निवडणुकीची नव्याने तयारी करत आहेत. मात्र असे असताना राहुल गांधी मात्र सुट्टीवर परदेशात गेले असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने यावर काहीही अधिकृत निवेदन केलेले नाही.

तेलंगणा काँग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये असलेल्या तणावानंतर तेलंगणातील नेत्यांनी दिल्लीत येऊन राहुल यांची भेट घेतली होती. त्यामुळे राहुल गांधी तेलंगणाला दोन दिवस दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते आता सुट्टीवर परदेशात गेल्याने तेलंगाणा दौरा पुढे ढकलला आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेससमोर मोठे आव्हान आहे. वर्षीच्या अखेरीस गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. कॉंग्रेसचे राहुल गांधी हे पार्ट टाईम नेता असल्याचे भारतीय जनता पार्टी नेहमीच टीका करत असते.

हे ही वाचा:

सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?

ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

थकबाकी असतानाही कोल इंडियाने केली राज्याच्या कोळसा पुरवठ्यात वाढ

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू ; मुलगी सुखरूप

दरम्यान, राहुल गांधी यांच्या परदेशवाऱ्या सध्या वाढतच आहे. पाच महिन्यात राहुल गांधींचा हा दुसरा परदेश दौरा आहे. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये राहुल गांधी एक महिन्यासाठी खासगी दौऱ्यावर परदेशात गेले होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ते परदेशात जाणार होते मात्र काही कारणास्तव तो दौरा त्यांनी पुढे ढकलला आणि सध्या ते परदेशात गेले आहेत.

Exit mobile version