राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जालना येथे इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी शरद पवार भाषण करत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने मंचावर जाण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शरद पवार हे जालना येथे भाषण देत असताना एक व्यक्ती अचानक पोलिसांना गुंगारा देत स्टेजवर पोहोचली. पोलिसांना गुंगावून स्टेजजवळ असलेलं सुरक्षा कवच मोडून ही व्यक्ती मंचावर पोहोचल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. एका अज्ञात व्यक्तीने मंचावर पोहोचणं ही गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे.
ही व्यक्ती मंचावर पोहोचताच उपस्थित पोलिसांची काही वेळ तारांबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला तिथून हटवले असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा:
गोलमालमधील ‘रत्ना’ काळाच्या पडद्याआड
रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करून हल्ला केला होता. त्यानंतर माध्यमांचे कॅमेरे घटनास्थळी पोहोचले पण पोलीस का नाही पोहचले असे सवाल अनेक नेत्यांनी उपस्थित केले होते. पोलीस यंत्रणेवर टीकाही करण्यात आली होती.