27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादेबश्री चौधरींचे पोस्टर लावताना भाजपा नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर प. बंगालमध्ये हल्ला

देबश्री चौधरींचे पोस्टर लावताना भाजपा नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर प. बंगालमध्ये हल्ला

‘राज्यात एकही महिला सुरक्षित नाही’: भाजपची टीका

Google News Follow

Related

भाजपनेत्या सरस्वती सरकार पक्षाच्या खासदार देबश्री चौधरी यांच्या प्रचारात असातना शनिवारी रात्री त्यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पश्चिम बंगालच्या कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कसबा येथील अनादापूर परिसरात ही घटना घडली.

आज तक बांग्लाने दिलेल्या वृत्तानुसार, सरस्वती सरकार या कसबा महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजपा खासदार देबश्री चौधरी यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावत असताना भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
आता सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिज्युअलमध्ये, जखमी भाजपा नेत्याच्या डोक्यातून रक्तस्राव होताना दिसत आहे. जेव्हा ‘आजतक बांग्ला’चे वार्ताहर भाजप कार्यकर्त्याशी बोलले तेव्हा त्यांनी याबाबत सांगितले. ‘सरस्वती सरकार यांच्या डोक्यावर बंदुकीचे घण घालण्यात आले. त्यांच्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला,’ असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजप खासदार देबश्री चौधरी यांनी सरकार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याप्रकरणी आनंदपूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

‘कसबा मंडल अध्यक्षांवर टीएमसी गुंडांनी केलेल्या क्रूर हल्ल्याच्या विरोधात आनंदपूर पोलिस ठाण्यामध्ये निषेध. आनंदपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बेपत्ता आहेत, त्यांना सरस्वती सरकारवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी लागेल,’ अशी मागणी खासदार चौधरी यांनी केली.

भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनीही तृणमूल सरकारवर टीका केली. ‘पश्चिम बंगालमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही. काल रात्री तृणमूलच्या गुंडांनी भाजपच्या कसबा मंडल अध्यक्ष (दक्षिण कोलकातामध्ये) सरस्वती सरकार यांना लक्ष्य केले. बंगालच्या गृहमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचे हे मोठे अपयश आहे. कल्पना करा जर कोलकाता सुरक्षित नसेल तर संदेशखाली किती वाईट असेल. बंगालचे लोक या अत्याचारांना प्रत्युत्तर देतील,’ असे ते म्हणाले त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनीही सरस्वती सरकारवरील हल्ल्याचा निषेध केला. ‘पश्चिम बंगालचे लोक हे पाहात आहेत. ते याला सडेतोड उत्तर देतील,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे ही वाचा:

काँग्रेस संपत्तीच्या वाटणीसाठी वक्फ नव्हे, अन्य समुदायांची संपत्ती घेईल

चेन्नईचे धडाक्यात अव्वल चार संघांमध्ये पुनरागमन!

धावगतीवरून टीका करणाऱ्यांना कोहलीचे सडेतोड प्रत्युत्तर!

मीरारोडमध्ये लव्ह जिहाद; बिर्याणीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, धर्म बदलण्याची सक्ती!

अलीकडेच तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदुल रहमान लोकांना भाजपला मतदान न करण्याची धमकी देत होते. “तुमचे मत वाया घालवण्याचे धाडस करू नका आणि खोटेपणा करू नका. केंद्रीय दल २६ तारखेला निघून जाईल आणि तुम्हाला आमच्या सेनेसह येथेच ठेवले जाईल. तेव्हा जे घडेल, त्याची तक्रार करू नका,’ असे चोप्रा मतदारसंघातील तृणमूलचे खासदार सांगताना ऐकू येत आहे.

हमीदुल रहमान यांनी मतदारांना २०२१च्या विधानसभा निवडणुका आणि २०२३ च्या पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या तृणमूलच्या हिंसाचाराची आठवण करून दिली. या वर्षी मार्चमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधितांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या सुमारे पाच घटनांची नोंद झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा