काँग्रेसची भारत जोडो यात्रा काही काळ विराम घेणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे काही दुसरे बेत दिसत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या यात्रेसंदर्भात सांगितलेकी, आम्ही हा प्रवास थोडा थांबवू. पण काही काळ भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधी कुठे जाणार हे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रा काही दिवस खंडित करत असल्याची माहिती दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी नवीन वर्षात परदेशात जाणे हे नवीन नाही याआधीही ते नववर्षाला परदेश दौरे करत होते पण त्यात कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्ष व्यस्त असताना ते असेच नववर्षासाठी परदेशी गेले होते. म्हणूनच यावेळीही अशीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वास्तविक पाहता २५ डिसेंबरपासून ख्रिसमस आणि नववर्षाची तयारी आपल्याकडे जोरात सुरु असते. पण अशा स्थितीत कार्यकर्त्यांनी ख्रिसमस आणि नववर्षे साजरे केल्यास भारत जोडोची काय स्थिती होणार अशी चिंता काँग्रेस पक्षाला सतावत आहे. भारत जोडो यात्रेत राहूल गांधी एकटे पडण्याची भीती पक्षाला वाटत आहे.
हे ही वाचा:
सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर
कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?
९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा २४ डिसेंबरच्या संध्याकाळी दिल्लीत पोचेल असे सांगितले. नंतर काही दिवस यात्रा थांबवून पुन्हा ३ जानेवारी २०२३ रोजी या यात्रेचा प्रवास सुरु होईल. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीला तोंड देण्यासाठी कंटेनर तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रा सुरु झाल्यापासून भारतातील यात्रेकरू आपल्या कुटुंबा बरोबर वेळ घालवू शकले नाहीत तर आता ते नऊ दिवस आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवतील असेही जयराम रमेश यांनी सांगितले.