तौक्ते चक्रीवादळानंतर मुंबईत अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं. यातच मुंबईतील वरळी परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. याचाच व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरले आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता वरळीतील पाणीसाठ्याकडे बोट दाखवून आदित्य ठाकरेंना जाब विचारला जात आहे. ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे… वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही. pic.twitter.com/f90KTRvObR
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2021
“हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
मुंबईत एकूण पाच ठिकाणी घरे पडणे आणि भिंती खचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही मार लागला नाही. मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
प्लाझ्मा थेरेपी आता बंद, कारण काय?
मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती
देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण
पाऊस, सोसाट्याचा वारा आणि ढगाळ हवामान यामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईतील वातावरण ढगाळ राहणार आहे. येत्या २४ तासात मुंबीत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.