कुठे गेले अनिल देशमुख?

कुठे गेले अनिल देशमुख?

अटकेच्या भीतीमुळे गायब झाल्याची चर्चा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. ईडीकडून तीनवेळा समन्स पाठवूनही देशमुख चौकशीला हजर झाले नाहीत शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्य चौकशीला हजर झाले नाहीत. पण सोमवारी देशमुख यांनी एक व्हीडिओ जारी करत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ईडीसमोर येणार असल्याचे म्हटले आहे. तरी ते कुठे आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केल्यानंतर आणि आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्या घरांवर छापे पडण्यास सुरुवात झाली. रविवारीदेखील त्यांच्या नागपूर येथील घरावर छापे टाकण्यात आले होते. तेव्हापासून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. अटकेच्या भीतीमुळे ते गायब झालेत का, असा सवाल उपस्थित करत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्यांचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा:

अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?

शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’

खरंच, जीवितहानीसाठी शिवसेना सोडून बाकी सगळे जबाबदार

येत्या २४-३६ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

अनिल देशमुख हे याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गेल्यापासून कोणाच्याही संपर्कात नाहीत. ते कुठे आहेत याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही. शिवाय त्यांचा फोनही बंद असल्याची माहिती मिळते. ईडीने रविवारी नागपूरमधल्या त्यांच्या दोन घरांवर छापा टाकला होता.

ईडीच्या समन्सला उत्तर देताना देशमुखांनी वकिलांच्या माध्यमातून वेगवेगळी कारण सांगत वेळ वाढवून मागितला आहे.

ईडीने कठोर कारवाई करू नये म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही..

Exit mobile version