गेले देशमुख कुणीकडे?

गेले देशमुख कुणीकडे?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता ते ‘मिस्टर इंडिया’ आहेत. ईडीकडून तीनवेळा समन्स पाठवूनही देशमुख चौकशीला हजर झाले नाहीत, शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यही चौकशीला हजर झाले नाहीत. देशमुख यांनी एक व्हीडिओ जारी करत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ईडीसमोर येणार असल्याचे म्हटले होते. तरी ते कुठे आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत ईडीला वकिलांमार्फत पत्र दिलं आहे. यामध्ये त्यांनी याआधी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या आता देखील केल्या आहेत. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसंच, मला ‘इसीआयआर ‘ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली आहे.

अनिल देशमुख यांनी ईडीकडून अटक होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३० जुलै रोजी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांची ईडीने अटक करु नये ही मागणी देखील मान्य केलेली नाही.

हे ही वाचा:

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाचा फटकार

तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना प्रतिमहिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत तपास सुरु आहे.

Exit mobile version