उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. अखिलेश ज्या राजकीय पक्षाशी युती करतात तिथे मतभेद होतात. त्या पक्षांचे नेते त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध आवाज उठवतात, नाहीतर पक्ष सोडून जातात. अशी टीका त्रिपाठी यांनी अखिलेश यांच्यावर केली आहे.
जहां-जहां अखिलेश
वहाँ-वहाँ क्लेशपहले चाचा और पिताजी से किया क्लेश
हाथ का पकड़ा साथ तो कांग्रेस में हुआ क्लेश
जब हाथी बना साथी तो वहाँ भी फैला क्लेश
अब चौधरी की आरएलडी में मच गया क्लेशसचमुच अद्भुत हैं अखिलेश
अध्ययन करो केस है विशेष#बुरा_न_मानो_होली_है pic.twitter.com/9aCFu4ejra— Rakesh Tripathi (@rakeshbjpup) March 20, 2022
राकेश त्रिपाठी यांनी ट्विट करून अखिलेश यांना धारेवर धरले आहे. ट्विटमध्ये त्यांनी, ” जहां-जहां अखिलेश, वहां-वहां क्लेश! असे म्हणून पुढे अखिलेश यांच्या राजकारणातील अयशस्वी घडामोडींचा पाढा वाचला आहे. काकांनी आणि त्यांच्या वडिलांनी अंतर्गत वादामुळे कसा पक्ष सोडला हे सांगितले आहे.
ट्विटमध्ये त्रिपाठी म्हणाले, अखिलेश यांच्या काकांनी पक्ष सोडून त्यांचा स्वतःचा नवीन पक्ष काढला. तर अखिलेश यांचे वडील राजकारणातूनच बाहेर पडले. अखिलेश यादव यांनी जेव्हा काँग्रेसशी युती केली तेव्हा काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला होता. काँग्रेसमधील रिटा बहुगुणा जोशी या युतीनंतर भाजपासोबत गेल्या. या युतीनंतर काँग्रेसमध्ये सतत खाली जात आहे. पुढे जेव्हा बहुजन समजा पार्टीशी अखिलेश यांचा मेळ जमला तेव्हा तितेही संकट निर्माण झालं होत. बसपचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते यांच्यासह अनेक नेते त्यावेळी बसपातून बाहेर पडले.
हे ही वाचा:
मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचे रिसॉर्ट तुटणार
… म्हणून येणार इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!
कलम ३७० पुन्हा लागू करा…शिवसेनेची मागणी
‘१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा’
आता जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलातही अखिलेश यांच्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. यांनतर आरएलडीच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. ही सर्व टीका करून झाल्यानंतर त्रिपाठी यांनी शेवटी ‘बुरा ना मानो होली है’ असा हॅशटॅगही दिला आहे. आणि या सर्व घडामोडींचे खापर त्रिपाठी यांनी अखिलेश यांच्यावर फोडले आहे