राज्यात निर्माण झालेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणारं तोक्ते वादळाचं संकट या पार्श्वभूमीवर भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल भाजपाने केला आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT हे Work From Mantryalay कधीकरणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरेपडली, झाडेकोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट,मुख्यमंत्री घरात बसलेत. @AjitPawarSpeaks यांनीमंत्रालयात आपत्तीनिवारण कक्षात भेटदेऊन पहाणी तरी केली पण..2
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 17, 2021
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागोमाग एक असे तीन ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा सवाल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार?, कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी आलं. त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली. पण, मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
हे ही वाचा:
केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले
…आणि इस्लामिक देश आपापसातच भांडले
डीआरडीओचे कोरोनावरील औषध आता रुग्णांसाठी उपलब्ध
तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली
महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळविला आहे. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.