राज यांना कळले उद्धव ठाकरेंना?

राज यांना कळले उद्धव ठाकरेंना?

देशभरात २२ जानेवारी रोजी आयोध्येत उद्घाटन होत असलेल्या प्रभू श्री राम मंदिर आणि रामलला प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा शिगेली पोहोचली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रभर मनसैनिकांनी उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे पक्षप्रमुख हे त्या राम मंदिर उभारणीच्या आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने रोज उठून मीडियामध्ये काही ना काही विधाने करत आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी बाकीच्या फंदात पडू नका २२ जानेवारी रोजी गावागावात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. राजकारणाच्या मैदानात राजकारण करू पण देव, देश आणि धर्म जिथे येतो तिथे कसले राजकारण करायचे? आहे आम्ही हिंदू आणि हिंदुत्ववादी तर छातीठोकपणे तसे बोलून देशाभारात साजऱ्या होणाऱ्या या दिवाळीत सहभागी होण्याचे राहिले बाजूला त्यात काहीतरी कुसपट काढून मिडीयात बोलायचे ते कशासाठी तर आता कॉंग्रेसची मैत्री झाली आहे आणि ती अधिक घट्ट होण्यासाठी? असा प्रश्न सामान्य लोकांना पडल्याशिवाय राहिलेला नाही.

आज जे राज ठाकरे बोलले ते अगदी योग्यच बोलले. राज ठाकरे यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांची काही भारतीय जनता पक्षाबरोबर युती झालेली नाही. ते तर निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहेत. एक राजकीय नेते म्हणून त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताना ते सत्ताधारी असोत किवा विरोधात असणारे असोत त्यांच्यावर ते तोंडसुख घेताना पण दिसतात. पण जिथे देव, देश, धर्माचा विचार, कार्यक्रम येतो तिथे त्यांनी राजकरण केलेले नाही. आजच्या त्यांच्या आवाहनानंतर तेच जाणवले. बाकी काही असुद्या ज्या कार सेवकांनी संघर्ष केला, जे स्वप्न पहिले ते पूर्ण होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांनी कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेऊन आरत्या करा. उत्सव साजरा करा असे आवाहन केले. असे आवाहन उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना करता आले असते.

राजकारण काही असो. राम मंदिर हा विषय काही राजकारणाचा नाही. तो देशातल्या तमाम लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्या सोहळ्याच्या निमित्ताने मीडियामध्ये आपण रोज बोलणे, त्यावर काहीतरी टीका करणे म्हणजे संजय राऊत तर करतातच आता उद्धव ठाकरे सुद्धा बोलू लागले आहेत. आवळ्या शेजारी पोवळा बांधला वाण नाही तर गुण लागला असे जे आपण बोलत असतो तसा प्रकार उद्धव ठाकरे यांचा झाला आहे की काय? असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण काय तर महाराष्ट्रात त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी केलेली दोस्ती आणि दिल्लीत कॉंग्रेस नेत्यांसोबत वाढलेली उठबस.

काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले तर अत्यंत सन्मानाने निमंत्रण दिले असताना सुद्धा त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे नाही असा निर्णय घेतला. आता हा निर्णय कसा केवळ राजकारणासाठी घेतला याला सणसणीत उत्तर काँग्रेसच्याच नेत्याने दिले आहे. हिमाचल काँग्रेसचे नेते असणारे विक्रमादित्य सिंग यांनी आपण तर राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास जाणार असल्याचे सांगितले आहे. जे एका नेत्याला कळले ते एका राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या पक्षाला कळू नये यासारखे दुर्दैव ते कुठले.

अहो राम मंदिर हा या देशातील सर्वाच्या अस्थेचा विषय आहे. हे अजून या सो कॉल्ड पुरोगामी नेत्यांना समजलेच नाही. राम मंदिरासाठी या देशातल्या हजारो राम भक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ते स्वप्न आज इतक्या शतकाने पूर्ण होत आहे त्याचा विलक्षण आनंद या देशातील राम भक्तांना झाला आहे. चालू परिस्थितीत असलेल्या राजकारणाशी याचा काही संबंध नाही. हा विषयच वेगळा आहे. पण समजून घेतला तर ना? राजकारणच करायचे म्हटल्यानंतर काय कोण बोलणार पण जनता मतदानयंत्राच्या माध्यमातून नक्की बोलेल हेच खरे.

राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीपासून देशातील सर्व मंदिरांचा परिसर हा स्वच्छ असयला हवा त्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन केले. त्यांनी काल स्वतः काळाराम मंदिर परिसरात स्वच्छता केली. आज त्यांच्या आवाहनानंतर सर्वत्र स्वच्छता केली जात आहे आज त्याची सुद्धा उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका मंदिरात स्वच्छता अभियान राबवले तर ते त्याला थोतांड असे म्हणाले. आता स्वच्छता करणे हे कसे थोतांड असू शकेल. ज्या थोतांडावर ज्यांनी आयुष्यभर टीका केली आणि स्वच्छतेचा पुरस्कार केला आणि स्वतः झाडू घेऊन स्वच्छता केली त्या संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेच मूलमंत्र हा सुद्धा उद्धव ठाकरे यांना थोतांड वाटतो का? असा प्रश्न या निमित्ताने पडतो. महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान किती प्रभावीपणे राबवण्यात आले होते ज्याची दखल हि युनोने घेतली होती, याचाही विसर उद्धव ठाकरे यांना पडलेला दिसतो.

हे ही वाचा:

चिनी ड्रॅगनच्या वेटोळ्यात मालदीवचे वाटोळे!

आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिधीया यांनी कोल्हापूरमध्ये मंदिर परिसरात स्वच्छता केली. कसं असत राज्यकर्ते, राजकीय नेते कसे वागतात याचा प्रभाव हा त्यांच्या कार्यकर्त्यांवर, सामन्य जनतेवर पडत असतो. त्यामुळे अशी काम आधी राज्यकर्ते, राजकीय नेते यांनी करायची असतात. मग त्याची चळवळ तयार होत असते त्यातून समाजाचेच भले होत असते. त्यात काही बेरजेचे राजकारण नसते. पण यातही उद्धव ठाकरे यांना राजकारणच दिसले. राज ठाकरे यांनी आजच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा जो मेळावा घेतला त्यात त्यांनी स्वचता या विषयावरच भाषण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मात्र या राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना टार्गेट करायचे सुरु आहे. त्यांची हि जी चिडचिड झाली आहे त्यातून अशा प्रकारची विधान होत आहेत. त्यापेक्षा अशी चिडचिड या विषयात न करता त्यांनी २२ तारखेच्या सोहळ्यात तनमनाने सहभागी व्हावे, त्याचा जो आनंद त्यांच्या मनाला होईल तो बाकी सगळ्यापेक्षा वेगळा असेल.

Exit mobile version