येत्या काळात बरेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी वक्तव्य केले होते.शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सत्ताधारी आणि विरोधक यावर प्रतिक्रिया देत आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला पक्ष चालवणे आता शक्य होणार नसल्याचे शरद पवारांना आता कळून चुकले आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा करत आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आहे तो कदाचित काँग्रेसमध्ये विलीन करायचा आहे, तसे त्यांच्या डोक्यात असेल आणि यात काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवारांनी अनेक पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये त्यांनी विलीनही केले.त्यामुळे त्यांनी आता संकेत दिला आहे की आता त्यांना त्यांचा पक्ष चालवायला शक्य होणार नाही.त्यामुळे लोकसभेच्या निवणुकीनंतर ते शरद पवार पक्ष काँगेसमध्ये विलीन करतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
राहुल गांधी आता अंबानी-अदानींबद्दल बोलत नाहीत, त्यांच्याकडून किती माल घेतला?
सदावर्ते दांपत्याचे एसटी बँक संचालकपद गेले!
यजुवेंद्र चहलचे ३५०, टी-२० क्रिकेटमधील पहिला भारतीय गोलंदाज
समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलीवर पक्षाच्याच आमदाराकडून बलात्कार, ब्लॅकमेल
काँग्रेस नेते नाना पाटोले म्हणाले की, देशपातळीवर चर्चा सुरु आहे.राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा मला त्यांनी सांगितले होते की काही पक्षांचा आम्हाला प्रस्ताव आहे.त्यामुळे भाजपच्या विरोधात अनेक पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिका अनेक पक्षांनी मांडली आहे, असे राहुल गांधी यांनी मला सांगितले होते.त्यामुळे शरद पवार जे सांगत आहेत त्यात तथ्य आहे, यात काही दुमत नाही.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचे आहेत,त्यामुळे हे विचार कोणीही संपवू शकत नाहीत, पुसू शकत नाहीत.जेष्ठ वकील आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, वार साहेब जेष्ठ अनुभवी राजकारणी आहेत.आपला पक्ष कुठला, राजकीय पक्ष कुठला त्यामुळे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, यावर त्यांनीच काय ते स्पष्ट करावं.