८.३० ला मतमोजणी सुरू होते पण ८.१० ला लीड कसे दाखवता?

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विचारला गंभीर सवाल

८.३० ला मतमोजणी सुरू होते पण ८.१० ला लीड कसे दाखवता?

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. याचंवेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक्झिट पोलकडून असलेली अपेक्षा आणि निकालाच्या दिवशीचे वास्तव यावर भाष्य केले. हरियाणामधील सकाळचे निकाल दुपारपर्यंत कसे बदलले आणि का बदलले या अनुषंगाने त्यांनी भाष्य केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक संपल्यानंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. मतदान झाल्याच्या संध्याकाळी ६ वाजल्यापासून अपेक्षा वाढल्या. हेचं चित्र पाहायला मिळणार असा विचार सर्वांच्या डोक्यात आला. एक्झिट पोल समोर आले. पण एक्झिट पोलला कोणताही शास्त्रीय आधार नाही. जेव्हा मतमोजणी सुरू होते, तेव्हा सकाळी ८.०५- ८.१० वाजता निकाल बाहेर येऊ लागतात आणि हा निव्वळ मूर्खपणा आहे. पहिली मतमोजणी (ईव्हीएमची) सकाळी ८.३० वाजता सुरू होते. पण, सकाळी ८.०५- ८.१० वाजताचं कोणी लीड घेतली हे दाखवलं गेलं. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, एक्झिट पोलची आकडेवारी खरी करण्यासाठी हे ट्रेंड्स दाखवले जातात का? आम्ही तर एक्झिट पोलमध्ये असेच दाखवले होते आणि आता तसेच ट्रेंड्स येत आहेत. आताचे आता दाखवू नंतरचे नंतर पाहू, असे सुरू असते का? असं राजीव कुमार म्हणाले.

यानंतर अचानक पहिल्या फेरीचा निकाल समोर येतो. आम्ही आमच्या वेबसाईटवर निकाल ९.३० वाजता पब्लिश करतो. यानंतर ११.३० वाजता, १.३० वाजता टाकतो. जरी तुमचे सहकारी आत असतील तरी आकडेवारी येण्यास वेळ लागतो. आम्हाला निकाल पब्लिश करण्यापूर्वी काही गोष्टी कागदोपत्री कराव्या लागतात. यासाठी साधारण अर्धा तास जातो. तरीही ९ वाजण्याला १० मिनिट असताना निकाल कसा बाहेर येतो, असा प्रश्न राजीव कुमार यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : 

मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’

‘पंतप्रधान मोदी आले असते तर बरे झाले असते, आज आम्ही सर्वांकडून भीक मागत आहोत’

विधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी लागणार निकाल

‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कुदळ मारून, नारळ वाढवून केले भूमिपूजन’

एक्झिट पोलमधून निर्माण झालेल्या अपेक्षा पावणे नऊ पर्यंत दाखवल्या गेल्या. यात ते लीड करत असतात आणि अचानक पहिल्या फेरीचा निकाल बाहेर येतो. यात दाखवत असलेली आणि खऱ्या निकालाची आकडेवारी जुळत नाही. या विसंगतीमुळे अनेकवेळा गंभीर समस्या उद्भवू शकतात, असा इशारा राजीव कुमार यांनी दिला. अपेक्षा आणि वास्तव यातील अंतर हे निराशेशिवाय दुसरे काही नाही. त्यामुळे हा मुद्दा असा आहे की त्यावर थोडा विचार करण्याची गरज आहे, असं राजीव कुमार म्हणाले.

Exit mobile version