८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन

८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन

देशात आणि विशेषतः राज्यात वाढती ओमिक्रोनची रुग्ण संख्या लक्षात घेता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? या प्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन कधी लागू शकतो याचे गणित जनतेसमोर मांडले आहे.

लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने राज्यात लॉकडाऊन केव्हा लावायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र, संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल, असे गणित राजेश टोपे यांनी लॉकडाऊनसाठी मांडले आहे.

हे ही वाचा:

सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात

लुधियाना कोर्टात पोलीस कर्मचाऱ्यानेच घडवला बॉम्बस्फोट

नितेश राणेंची नवाब मालिकांना ट्विटरवरून टोलेबाजी

पालिकेचे सफाई कर्मचारीच करतायत कचरा

ओमिक्रॉनचा संसर्ग वेग अधिक असला तरी त्याचा प्रभाव कमी असल्यामुळे ओमिक्रोन रुग्णांना ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. मात्र, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते, असे राजेश टोपे म्हणाले. केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. शुक्रवार २४ डिसेंबर पासून राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version