पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

पंतप्रधानांशी झालेल्या संवादाचे केजरीवाल यांनी केले थेट प्रक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या ऑनलाइन संवादाचे थेट प्रक्षेपण करून शिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केजरीवाल यांना त्या संवादादरम्यानच फटकारले. शिष्टाचार मोडू नका, गोपनीय बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे योग्य नाही, असे पंतप्रधानांनी त्यांना सुनावले. त्यावर केजरीवाल यांनी पंतप्रधानांची माफी मागून यापुढे असे होणार नाही, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. पंतप्रधानांशी मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या संवादाचे प्रथमच असे थेट प्रक्षेपण करून केजरीवाल यांनी आपल्या कुरापतखोरीचे प्रदर्शन पुन्हा केले.
केंद्र सरकारवर आरोप करून आपले अपयश झाकण्याचा नेहमीच प्रयत्न करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी चांगलेच तोंडावर आपटले.

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जण दगावले

पंतप्रधानांशी होत असलेला खासगी संवाद टीव्हीवर थेट दाखविणे हे शिष्टाचारात बसणारे नसते. तरीही केजरीवाल यांनी त्या संवादाचे थेट प्रक्षेपण काही काळ टीव्हीवर केले. या संवादादरम्यान पंतप्रधांनांनी केजरीवाल यांना थांबवून त्यांच्या या कृतीची निंदा केली. पंतप्रधान म्हणाले की, आपली जी परंपरा आहे, जो शिष्टाचार आहे, त्याच्या विरुद्ध हे वर्तन आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्याने आपल्या गोपनीय बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे योग्य नाही.आम्ही यासंदर्भात नेहमीच संयमाचे पालन करायला हवे. पंतप्रधानांनी खडसावल्यानंतर केजरीवाल चांगलेच बॅकफूटवर गेले आणि त्यांनी यापुढे आपण ही बाब लक्षात ठेवू, असे सांगितले. राजकारण करण्याच्या उद्देशानेच केजरीवाल यांनी हा प्रकार केल्याची टीका केंद्र सरकारने केली. त्यावर केजरीवाल यांच्या कार्यालयाकडूनही माफी मागण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोनाच्या परिस्थितीसंदर्भात संवाद साधला. पण हा संवाद खासगी असतो. त्याचे प्रक्षेपण करता येत नाही. मात्र हा नियम केजरीवाल यांनी मोडल्याचे दिसले. दिल्लीतील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची किती निकड आहे, त्यात लक्ष घालून पंतप्रधानांनी मदत करावी अशी मागणी केजरीवाल या बैठकीत करताना त्याचे थेट प्रक्षेपण होत होते.
सूत्रांनी यासंदर्भात सांगितले की, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या स्थितीत आपण काय करत आहोत, याविषयी सांगितले पण केजरीवाल यांनी आपले सरकार काय करते आहे, हे सांगितले नाही.
केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून असे सांगण्यात आले की, केंद्राकडून हा संवाद थेट दाखविला जाऊ नये असे कोणतेही आदेश नव्हते. अशा संवादात जनसामान्यांच्या हिताच्याच गोष्टींची चर्चा होत असते त्यात कोणत्याही गोपनीय माहितीची चर्चा केली जात नाही. तरीही यामुळे जर काही गैरसमज झाला असेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

Exit mobile version