राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी कपाळावर हात मारला!

राहुल गांधींनी मात्र ट्विट करत सीतारामन यांच्यावर खापर फोडले

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी कपाळावर हात मारला!

राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत ४६ मिनिटे भाषण केले त्यात त्यांनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना, पेपर लीक, अग्निवीर हे विषय पुन्हा उपस्थित केले. त्यादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राहुल गांधी यांच्यातील क्रियाप्रतिक्रियेची चर्चा झाली.

राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील या चर्चेत अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांमध्ये ओबीसी, अल्पसंख्य नसल्याची खंत व्यक्त केली. हलवा समारंभाचा एक फोटो त्यांनी संसदेत दाखविला आणि त्यात एखादा ओबीसी, अल्पसंख्य दिसत असल्याचे म्हटले. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना थांबवले आणि असा फोटो दाखविणे नियमाला धरून नाही याची आठवण करून दिली.

हे ही वाचा:

उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!

उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहाद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

केजरीवालांविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !

राहुल गांधी हा मुद्दा उपस्थित करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कपाळाला हात लावला. त्याची चर्चा नंतर सगळीकडे झाली. त्याचे भांडवल करताना राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की, मी जातीनिहाय जनगणनेबाबत संसदेत बोलत होतो, पण अर्थमंत्र्यांनी त्याची थट्टा उडविली. देशाच्या ९० टक्के जनतेशी संबंधित मुद्दा उपस्थित केला असतानाही त्याची चेष्टा केली गेली. यावरून भाजपाची नियत स्पष्ट होते. पण प्रत्यक्षात अर्थमंत्री सीतारामन यांनी या मुद्द्यावर कपाळावर हात मारून घेतलाच नव्हता हे राहुल गांधी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी व्हीडिओसह स्पष्ट केले. सीतारामन यांनी अर्थसंकल्पापूर्वीच्या हलवा समारंभात ओबीसी, अल्पसंख्य नव्हते या आक्षेपावर कपाळावर हात मारला होता.

 

Exit mobile version