केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून मागच्या अनेक महिन्यांपासून राजकारण तापलेलं आहे. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज शिरोमणी अकाली दलच्या खासदार आणि माजी मंत्री हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांच्यात संसद भवन परिसरातच कृषी कायद्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांच्या खडाजंगीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हरसिमरत कौर आणि रवनीत बिट्टू कृषी कायद्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
#WATCH | Delhi: A verbal spat broke out between Shiromani Akali Dal MP Harsimrat Kaur Badal and Congress MP Ravneet Singh Bittu over Central Government's three Farm Laws. pic.twitter.com/y9oAykOzy1
— ANI (@ANI) August 4, 2021
शिरोमणी अकाली दलच्या खासदार आणि माजी मंत्री हरसिमरत कौर यांनी संसद भवन परिसरात नव्या कृषी कायद्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होत्या. यावेळी काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही निदर्शने बोगस असल्याचं सांगितलं.
शिरोमणी अकाली दलच्या खासदार आणि माजी मंत्री हरसिमरत कौर यांनी संसद भवन परिसरात नव्या कृषी कायद्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होत्या. यावेळी काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही निदर्शने बोगस असल्याचं सांगितलं.
हरसिमरत यांची निदर्शने म्हणजे ढोंग असल्याचं रवनीत बिट्टू यांनी यावेळी म्हटलं. ”हरसिमरत कौर यांनी स्वतः मंत्री असताना या कायद्यांना विरोध केला नाही. त्यांनी स्वतः या विधेयकांना पारित केलं. जेव्हा शेतकऱ्यांमध्ये कायद्यांविरोधात रोष वाढत गेला तेव्हा हरसिमरत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जेव्हा विधेयक पारित होत होतं तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला? आता केवळ दाखवण्यासाठी तुम्ही कृषी कायद्यांचा विरोध करत आहात,” असं काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी म्हटलं.
हे ही वाचा:
पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत
खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार
ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा
उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव तरीही ‘हे’ पदक केलं निश्चित
रवनीत बिट्टू यांच्या आरोपांना हरसिमरत कौर बादल यांनीही तेवढंच आक्रमक प्रत्युत्तर दिलं. ”विधेयक पारित होत असताना राहुल गांधी कुठे होते असं यांना विचारा. ते संसद सोडून गेले होते आणि काँग्रेसने वॉकआऊट केल्यामुळेच ही विधेयके पारित होण्याला मदत झाली.” असं प्रत्युत्तर हरसिमरत कौर यांनी दिलं.