जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…

जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…

देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना एक उत्तम प्रशासक आणि नेते म्हणून ठाऊक आहेतच, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अनोखा पैलु समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर विविध लोकांना मदत केली आहे. मात्र त्यांनी याचा स्वतःहून गाजावाजा कधीही केलेला नाही.

अलिकडेच त्यांनी मदत केल्यानंतर पत्रकार रुबिका लियाकत यांनी एका ट्वीट द्वारे मोदींनी केलेल्या मदतीचे वर्णन करून, त्यांचे आभार देखील मानले होते. त्याबरोबरच त्यांनी दुःखाच्या प्रसंगात सहाय्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते.

रुबिया यांच्या आई डॉक्टर फातमा लियाकत यांचे २८ मे रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून रुबिया यांना शोकसंदेश प्राप्त झाला. हा संदेश केवळ शासकिय प्रथेचा भाग म्हणून पाठवण्यात आला नव्हता, तर त्यात मोदींनी फातमा लियाकत यांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा केली होती.

इदच्या काळात रुबिया यांच्या आई फातमा आजारी पडल्या होत्या. पचनसंस्थेला विकार झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रुबिया यांना फोन आला होता. त्यावेळी मोदींनी रुबिया यांना ईदच्या शुभेच्छा तर दिल्याच, त्याशिवाय फातिमा यांच्याशी देखील बातचीत केली. त्यावेळी, मोदींनी फातिमा यांना आजाराशी लढण्याची हिंमत दिली.

हे ही वाचा:

ट्विटरवर सुशांत सिंह राजपूत ट्रेंडिंग

मुंबईत एसटी बंद; लोकांच्या त्रासात भर

तृणमूलच्या अत्याचारांविरोधात महिलांनीही ठोठावले कोर्टाचे दरवाजे

आशा सेविकांचा ठाकरे सरकारविरूद्ध संपाचा एल्गार

त्यानंतर फातिमा यांच्या संपूर्ण उपचारादरम्यान पंतप्रधान कार्यालय त्यांच्याशी संपर्कात होते. उदयपूर येथे त्यांचे उपचार चालू असताना एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ लिवर अँड बिलियरी सायंसेजचे डायरेक्टर डॉक्टर एस.के. सरीन हे तेथील डॉक्टरांच्या संपर्कात होतेच त्याशिवाय डीसीजीआयकडून कोणत्याही प्रकारचे औषध पुरवण्याची तयारी दाखवली जात होती. अखेरीस २६ दिवसांच्या उपचारांनंतर डॉ फातमा यांचे निधन झाले. रुबिया यांना या संपूर्ण कालावधीत पंतप्रधान त्यांच्यासोबत असल्याचे त्यांना फार विशेष वाटले होते.

अशाच प्रकारचा अनुभव देशाचे मुख्य सुचना आयुक्त उदय माहूरकर यांना देखील आला. त्यांच्या पत्नी स्मिता माहूरकर यांना कोविडची लागण झाली होती. त्यावेळी देखील माहूरकर यांना मोदींचा असाच हृद्य अनुभव आला. स्मिता माहूरकर यांच्या कोविड काळात पंतप्रधान मोदी संपर्कात होते. अशाच प्रकारे मोदींनी माहूरकर यांना मागील वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर देखील मोदींनी सहारा दिला होता.

अशा प्रकारे मोदींनी त्यांच्या विरोधी विचाराच्या एका पत्रकाराला देखील सहाय्य केले होते. मोदींनी अनेकांना कोविड काळात मदत केली आहे. अनेकांशी मोदींनी थेट व्यक्तिशः संपर्क साधला होता.

Exit mobile version