मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते

मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाबे दणाणले आहेत. या संबंधित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून राष्ठ्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या संपूर्ण विषयाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांनी या संपूर्ण प्रकारणात मुस्लिम कार्ड खेळायचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम समाजातील कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते असे पवार यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी हे विधान केले. तर मलिक यांच्यावर कारवाई होणार याची आम्हाला खात्री होती असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे ज्याप्रकारे केंद्र सरकार विरोधात आणि तपस यंत्रणांविरोधात बोलत आहेत ते बघता त्यांना त्रास देण्यात येईल हे आम्हाला माहीत होते असे पवार म्हणाले.

हे ही वाचा:

‘खीर खाल्ल्यावर कितीही चेहरा भोळा भाबडा केला, तरी घागर बुडणारच’

‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’

नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?

१९ बंगल्यांप्रकरणी सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

तर मुस्लिम समाजातील कार्यकर्ता असेल तर त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते असे पवार म्हणाले. मी जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या असे पवार म्हणाले. त्याला आता २५ वर्ष झाली. पण २५ वर्षानंतर अजूनही तीच नावे घेऊन आरोप केले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात बोलले की अशी कारवाई केली जाते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो असे पवार म्हणाले.

दरम्यान आज सकाळी नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून सकाळी ७.४५ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरु आहे. तब्बल पाच तास उलटून गेले तरी ही चौकशी अद्याप संपलेली नाही.

Exit mobile version