भारताची प्रगती होते तेव्हाच जगाच्या विकासाला गती मिळते

भारताची प्रगती होते तेव्हाच जगाच्या विकासाला गती मिळते

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेला संबोधित केले. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या या ७६ व्या महासभेत मोदींनी जागतिक नेत्यांसमोर विविध विषयांवरील भारताची भूमिका आणि कामगिरी मांडली. यावेळी त्यांनी ‘जेव्हा भारताची प्रगती होते तेव्हाच जगाच्या विकासाला गती मिळते’ असे म्हणत भारतातील विकासपर्वाचे महत्व अधोरेखित केले.

गेल्या दीड वर्षापासून सारे जग हे शंभर वर्षातील सर्वात भयंकर अशा महामारीचा सामना करत आहे. तर जगभरातील अनेक नागरिकांनी या महामारीत आपले प्राण गमावले आहेत असे म्हणत या साऱ्यांनाच पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का?

योगी सरकारची लसीकरणात कोटी कोटी उड्डाणे

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

पुढे जाऊन त्यांनी भारतीय लोकशाहीचे महत्त्वही जगासमोर मांडले. विविधता ही भारताच्या लोकशाहीची ओळख असल्याचे मोदी म्हणाले. तर भारत हीच लोकशाहीची जननी आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले. भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ७५ वे वर्ष साजरे करत आहे. लोकशाही उत्तम प्रकारे काम करू शकते हे दाखवून दिले आहे. आज जगातील प्रत्येक सहावा मनुष्य हा भारतीय आहे. त्यामुळेच जेव्हा भारताची प्रगती होते तेव्हाच जगाच्या विकासाला गती मिळ असे मत मोदी यांनी मांडले आहे.

मेक व्हॅक्सिन इन इंडिया
सेवा परमो धर्म ही भारताची ओळख असल्याचे सांगत त्यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेचेही कौतुक केले. जगातील पहिली डीएनए आधारित लस ही भारतात बनली आहे असे मोदी म्हणाली. तर त्यांनी भारताच्या वॅक्सिन मैत्री उपक्रमाचाही उल्लेख केला. भारत गरजू देशांना लस पुरवठा करत आहे. तर जगातील लस निर्माण करणाऱ्यांनी भारतात येऊन लसीची निर्मिती करावी असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

Exit mobile version