“जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ हे केवळ पोकळ शब्द होऊन राहतात. जर महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये महिलांविषयी जरा जरी सन्मान असेल तर त्वरित त्या सर्व पीडितांना न्याय मिळवून द्या आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून द्या.” असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अशा घटनांमध्ये सहभाग दिसतोय. तर इथे सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जातोय. कमी कलमं लावली जात आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. पटापट जामीन होत आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पण आता पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार, अशी खोचक टिप्पणीही पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा:
कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे
साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी
‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.