पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यामध्ये भरघोस मतदान झाल्यानंतर पुढच्या टप्प्यातील प्रचारसभांना रंग चढला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर बंगाल, कूचबिहारच्या सिताकुल्ची येथे जाहिर सभा घेतली.
यावेळी त्यांनी इथे आल्यावर नव्या उर्जेची प्राप्ती होते. येथे कामतेश्वरी, मदनमोहन, बाणेश्वर, सिद्धेश्वर कालीबाडी, ब्रम्हामंदिर अशी विविध मंदिरे असल्याचे उल्लेखून सांगितले. कूचबिहारचे प्रसिद्ध सेनापती चिला रॉयने मोगलांना हरवले होते. मी त्यांना वंदन करतो, असे म्हणत अमित शहांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला.
यावेळी त्यांनी ममता दीदींनी उत्तर बंगालवर कायम अन्याय केला. असा घणाघाती हल्ला देखील केला त्यांनी भाजपा राजनैतिक हिंसा बंद करेल असे देखील सांगितले. येथील राजवंशी परिवार, मदनमोहन मंदिर यात्रेवर सातत्याने अन्याय केला गेला आहे असे देखील अमित शाह म्हणाले.
हे ही वचा:
अँटिलिया स्फोटके प्रकरणातील मिस्ट्री वुमन ताब्यात, सचिन वाझेसमोरच्या अडचणी वाढणार?
कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल
या भागाचा काही विकास केला नाही असे सांगून अमित शहा यांनी दीदींवर निशाणा साधला उत्तर बंगालमध्ये आरोग्य सुविधा, कनेक्टिव्हिटी नाही. तंबाखूचे उत्पादन होते परंतु त्याला भाव मिळेल यासाठी काही केले नाही. अशा शब्दात त्यांनी रोष व्यक्त केला. याभागात कधी पूर आला की दीदी बघायला येत नाही असे सांगून त्यांनी कलकत्त्यापासून केवळ ७०० किमी दूर असलेला बंगाल दीदीच्या हृदयापासून ७००० किमी दूर आहे असे सांगितले.
सरकार स्थापन झाल्यानंतर उत्तर बंगालच्या विकासासाठी एक बोर्ड स्थापन करण्यात येईल. या बोर्डाला दरवर्षी ₹२००० कोटी देण्यात येतील असे ही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच येथे घुसखोरीचा प्रश्न मोठा असून ममता दीदी याबाबत काही करणार नाहीत असेही ते म्हणाले. केवळ भारतीय जनता पार्टी घुसखोरी रोखेल, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला. भाजपा सरकार आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच विविध उपक्रमांमध्ये चाय पार्क, हॉर्टिकल्चरला प्रोत्साहन, ठाकूर पंचानंद बर्मन यांचे ₹२५० कोटींचे स्मारक, त्याप्रमाणे ₹५०० कोटी खर्चून रासमेलाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणे अशा घोषणा त्यांनी केल्या. आरोग्यासाठी उत्तर बंगालसाठी एक एम्स बनवण्यात येईल असेही सांगितले.
मुलींसाठी केजी ते पीजी शिक्षण फ्री आणि उत्तर बंगाल मध्ये फुकट बसप्रवास देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी दीदीचे राज्य तानाशाही, टोलाबाजी, तुष्टीकरण या तीन ‘टी’वर आधारित असल्याचे सांगितले. तर मोदींचे राज्य विकास, विश्वास, व्यापार या ती ‘वि’वर आधारित आहे असे सांगितले. त्याबरोबरच त्यांनी बागडोगरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची घोषणा देखील केली. त्यामुळे बंगालचा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी मोदी उत्तर बंगालच्या कल्याणावर विश्वास ठेवतात असे सांगून सगळीकडे द्यावा लागणारा कट मनी बंद करू असा विश्वास जनतेला दिला. त्याबरोबरच सिंडिकेट, भ्रष्टाचार देखील नष्ट करण्याचे आश्वासन दिले. उत्तर बंगालमध्ये घुसखोरीची मोठी समस्या आहे. ती बंद करण्याचा विश्वास त्यांनी लोकांना दिला.
पहिल्या टप्प्यातील ६० पैकी ५० पेक्षा जास्त सिट भाजपा जिंकली असल्याचा विश्वास व्यक्त करून उत्तर बंगालातील एकही सीट दीदीला देऊ नका असेही त्यांनी लोकांना सांगितले.
प्रखर उन्हात बसावे लागल्याने दिलगीरी व्यक्त करून अमित शाह यांनी आपले भाषण संपवले.
Addressing a public meeting in Sitalkuchi, West Bengal. #EbarBJP https://t.co/0fnjL0bqme
— Amit Shah (@AmitShah) April 2, 2021