शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा आणि भाजपाच्या काही खासदारांनी काल लोकसभेत आणि राज्यसभेत परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’वरून गदारोळ केला होता, त्यावरून त्यांनी या सर्व खासदारांना लक्ष्य केले. याशिवाय शरद पवार सांगतील ते ब्रह्मवाक्य असल्याचेही सांगितले. संजय राऊत यांच्या या विधानाने सरकार नक्की कोण चालवतं? यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद काल लोकसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे खासदार गिरीश बापट आणि खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राष्ट्रपती राजवटीची मागणी लोकसभेत केली. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवलं. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
नवनीत राणांनी ठाकरे सरकारवर संसदेत केलेला हल्ला आणि शिवसेना खासदार संजय राऊतांविरुद्ध केलेली तक्रार हे शिवसेनेच्या वर्मी लागल्याचे चित्र दिसत आहे. नवनीत राणा यांच्यावर संजय राऊत यांनी नाव न घेता खालच्या दर्जाची टीका करून अनेक वेळा ‘नाचणारे’ असा उल्लेख केला. याशिवाय अरविंद सावंतांवर केलेले आरोप हे गंभीर नसल्याचा अजब दावाही त्यांनी केला.
हे ही वाचा:
म्हणे महाराष्ट्रात फिरू देणार नाही. बापजाद्यांची मालमत्ता आहे का तुमच्या?- अतुल भातखळकर
हॉस्पिटलनेच उघडे पाडले देशमुख-पवारांचे पितळ
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी
रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह
संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना शरद पवार जे सांगतात ते आमच्यासाठी ब्रह्मवाक्य असल्याचे सांगितले. शरद पवार हे या सरकारचा भागही नाहीत, परंतु ते सांगतील ते ब्रह्मवाक्य असलेल्या सरकारमध्ये शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा आणि तेही ठाकरे आडनाव असलेल्या मुख्यमंत्र्यांचा प्रभाव आणि पकड किती आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.