अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे. अजित पवार यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला.

निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना खडेबोल सुनावले. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी

पुण्यात हे असतील अनलॉकचे नियम

६१ दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

चीनचा प्रश्न सोडवायला नरेंद्र मोदी सक्षम

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.

Exit mobile version