तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय ससिकला यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. परंतु कोविड-१९ मुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ससिकला रुग्णालयातून बाहेर येण्याआधीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. पलनीसामी यांनी ₹७९ कोटींचे जयललितांच्या स्मारकाचे अनावरण केले. यातून जयललितांचा वारसा ससिकलांऐवजी आपलाकडेच असल्याचे पलनीसामींना दाखवायचे आहे. असे मत तामिळनाडूतील राजकीय विश्लेषकांनी दिले आहे.
शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आता निवडणुकीच्या चार महिने तुरुंगातून बाहेर पडल्यावर निवडणुकांवर किती प्रभाव पाडू शकतील हा सवाल आहे.
पलनीसामी यांनी ससिकला यांना एआयडीएमके पक्षातून काढून टाकले आहे. पलनीसामींना मुख्यमंत्री बनवण्यात सासिकलांचा मोठा सहभाग होता. परंतु नंतर पळणीसामींनी ओ. पनीरसेल्वम यांच्याशी हातमिळवणी करून ससिकला यांना पक्षातून बाहेर काढले.
ससिकलांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरन यालाही पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आरके पुरम मतदार संघातून टीटीव्ही दिनकरनने निवडणूक लढवली आणि एआयडीएमकेच्या उमेदवाराला हरवले.
ससिकला यांच्या पक्षाला २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत ५% मतं मिळाली होती. अशीच मतं त्यांनी २०२१ मध्ये होऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळाल्यास एआयडीएमके पक्षाला मोठा फटका बसू शकतो.