लंडनमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आहेत, राऊतांनी तिथे उपचार घ्यावेत!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

लंडनमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आहेत, राऊतांनी तिथे उपचार घ्यावेत!

उबाठाचे नेते संजय राऊत यांनी काल सामनाच्या लेखातून भाजपावर केलेल्या आरोपावरून भाजप अजूनही टीका करत आहे.नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. त्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असे संजय राऊत यांनी कालच्या (२६ मे) सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून म्हटले होते.राऊतांच्या आरोपानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली.दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.’गांजा पिऊन लेख’ लिहिणाऱ्यांबाबत काय बोलणार, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला असून सातव्या टप्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे.सर्वांना ४ जूनच्या निकालाची आस लागली आहे.दरम्यान, लोकसभेच्या निकालापूर्वी विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत.संजय राऊत यांनी कालच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून भाजपवर आरोप केले होते.नितीन गडकरींच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.तसेच फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

हे ही वाचा:

२० बंगलादेशींना ८ महिने तुरुंगवास

लोकसभा निवडणूक निकालाआधी ‘इंडी’ गट अंदाज घेणार

पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू!

वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्याला अटक

तसेच अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील.त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनीच उत्तर प्रदेशात फिरवला आहे, असे संजय राऊत यांनी लेखातून लिहिले. संजय राऊतांच्या आरोपावर भाजपने जोरदार टीका केली आणि ती अजूनही सुरूच आहे.

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राऊतांवर टीका केली आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुळात म्हणजे संजय राऊत यांच्याबाबत मला एकही प्रश्न विचारत जाऊ नका. ‘जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात’ त्यांच्याबाबद्दल काय बोलावे.मला अशी माहिती आहे की, ते लंडन गेले आहेत.लंडनमध्ये चांगले मानसोपचार तज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी तेथे चांगले उपचार घ्यावेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Exit mobile version