अमित शहा पहिल्या सहकार संमेलनात काय बोलणार? बारामतीचे विशेष लक्ष

अमित शहा पहिल्या सहकार संमेलनात काय बोलणार? बारामतीचे विशेष लक्ष

देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आज (शनिवारी) दिल्लीत होणाऱ्या सहकारावरील पहिल्या मेगा परिषदेला संबोधित करतील, जिथे ते या क्षेत्राच्या विकासासाठी सरकारचा आराखडा आणि रोडमॅपची रूपरेषा मांडण्याची शक्यता आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सहकार क्षेत्राच्या प्रश्नांसंदर्भात अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यामुळे या परिषदेकडे त्यांचेही लक्ष असेल.

देशातील सहकार चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने या वर्षी जुलैमध्ये तयार करण्यात आलेल्या नवीन सहकार मंत्रालयाचे मंत्री म्हणून अमित शहा हे भाषण करणार आहेत. हे पहिले सहकार संमेलन किंवा राष्ट्रीय सहकार परिषद आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आयोजित होणाऱ्या या परिषदेचे आयोजन इफको, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया, अमूल, सहकार भारती, नाफेड, क्रिभको इत्यादी सहकारी संस्था करत आहेत.

सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा आणि आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष एरियल गुआर्कोही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले की, “मंत्री सहकारी संस्थांना संबोधित करतील आणि सरकारचा दृष्टिकोन सांगतील आणि देशातील या क्षेत्राच्या विकासासाठी रोडमॅपची रूपरेषा सांगतील.”

ही पहिली संधी असेल जिथे सहकारातील सदस्य मंत्र्यांकडून या क्षेत्रासाठी सरकारच्या योजनेबद्दल थेट ऐकतील, असे अधिकारी म्हणाले. या कार्यक्रमात २,००० सदस्य वैयक्तिकरित्या उपस्थित राहतील, तर ८ कोटी व्हर्च्युअली सामील होतील. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स (ग्लोबल) शी संबंधित ११० देशांतील सुमारे ३० लाख सहकारी देखील व्हर्च्युअली सामील होण्याची अपेक्षा आहे, असे इफ्कोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

देशातील सहकारी चळवळीला बळकटी देणे, स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट प्रदान करणे आणि बहु-राज्य सहकारी संस्थांचा (एमएससीएस) विकास सक्षम करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे हा मंत्रालयाचा मुख्य मंत्र आहे. असेही इफकोने सांगितले.

Exit mobile version