…म्हणून चीनचे वांग यी मोदींना भेटायला आले होते!

…म्हणून चीनचे वांग यी मोदींना भेटायला आले होते!

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जवळपास दोन वर्षांनंतर भारताला भेट दिली. या दौऱ्याबाबत अगोदर कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. वांग यी हे गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत आले आणि शुक्रवारी दुपारी परत गेले. त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे.

वांग यी हे स्वतःच्या इच्छेने भारतात आले होते, त्यांना निमंत्रित केले नव्हते. त्यांनी भारत भेटीची घोषणाही केली नव्हती. त्यांची ही अचानक भारत भेट ही अतिशय रहस्यमय आहे. त्यातून काही अर्थ काढणे सोपे नाही. गुरुवारी रात्री ते भारतात पोहचले आणि दुसऱ्या दिवशी ते काबुलला गेले. मात्र वांग यांनी काबुलमधील परराष्ट्र मंत्री आणि तालिबानच्या अधिकाऱ्याची भेट घेतलीच नाही. काबुलमधून पुढे वांग हे श्रीलंकेला जाणार आहेत.

जगभरात कोरोनाची साथ पसरवल्याचा ठपका चीनवर आहे. त्यामुळे सध्या चीन हे जगभरात आपली प्रतिमा सुधारण्यात गुंतला आहे. चीनने आता पुन्हा आपल्या महासत्तेची प्रतिमा उजळवण्याचा निर्धार केला आहे. वांग यांचे भारतात येण्याचे उद्दिष्टही वेगळेच होते.

भारत-चीन सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी वांग हे भारतात आलेच नव्हते. या वादावर तोडगा काढण्यासाठी जर ते भारतात आले असते तर, त्या विषयावर त्यांनी ठोस प्रस्ताव ठेवला असता. मात्र तसे काही घडले नाही. पण डोवाल आणि जयशंकर यांच्याशी झालेल्या त्यांच्या संभाषणावरून असे दिसते की, त्यांचा भारतात येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्सच्या बैठकीवर बहिष्कार टाकू नये. जर पंतप्रधान मोदींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला तर चीनचे नाक कापले जाऊ शकते.

हे ही वाचा:

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’

बीरभूम हिंसाचाराच्या तपासादरम्यान सापडले क्रूड बॉम्ब

जेव्हा जयशंकर आणि डोवाल यांनी वांग यांच्यासमोर सीमा प्रश्न उपस्थित केला आणि तो सोडवल्याशिवाय दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत. असे सांगितले तेव्हा वांग यांनी ते मान्य केले आणि या मुद्द्यावर चर्चा सुरूच ठेवणार असल्याचेही वांग म्हणाले. यावेळी वांग यांनी डोवाल यांना चीन दौऱ्यावर येणाचे आमंत्रण केले आहे.

Exit mobile version