27 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरराजकारणजितेंद्र आव्हाड प्रकरणावर उद्धव ठाकरे बोलणार का?

जितेंद्र आव्हाड प्रकरणावर उद्धव ठाकरे बोलणार का?

Google News Follow

Related

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दल जनसामान्यांत चर्चा

शिवसेनेच्या प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याची चर्चा सुरू असली तरी ते जितेंद्र आव्हाड प्रकरणावर बोलणार का, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.

ठाण्यातील अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. त्यासंदर्भात आव्हाड यांना गुरुवारी अटक करण्यात आली नंतर जामिनावर त्यांची सुटकाही झाली. त्यावरून महाविकास आघाडी सरकारवर सर्वच स्तरातून टीका झाली. भाजपाने आव्हाड यांच्या हकालपट्टीची मागणी केली.

त्याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे हे काही भूमिका घेणार का, असा सवाल जनसामान्यांकडून विचारला जात आहे. यंदा हा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. राज्यातील जनेतासाठी अशा बंदिस्त सभागृहात २०० जणांना एकत्र येण्याची परवानगी दिली असली तरी मेळाव्याच्या निमित्ताने हे निर्बंध शिथिल करून १३०० लोकांना सभागृहात एकत्र येण्याची मुभा देण्यात आल्याचे कळते.

 

हे ही वाचा:

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण

सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच

भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!

 

ठाकरे सरकारच्या गेल्या दीड-दोन वर्षांच्या कार्यकाळात अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, वनमंत्री संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. अनेक मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे आरोप होत आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आयकर खात्याच्या छाप्यांचीही बरीच चर्चा झाली आहे. ईडीकडूनही अनेकांची चौकशी सुरू आहे. त्यात अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी अशा नेत्यांचा समावेश आहे. नुकतीच क्रूझवर धाड टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नार्कोटिक्स ब्युरोवर शरसंधान केले आहे. त्याचाही उल्लेख भाषणात उद्धव ठाकरे करणार का, याकडे लक्ष लागले आहे. ठाकरे सरकारला पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेले अपयश या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे काही बोलणार का की केवळ विरोधकांवरच शरसंधान करून मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळवणार याकडेही लक्ष असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा