पुणे कार अपघात प्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस या प्रकरणाकडे स्वतः लक्ष ठेवून आहेत.गुन्हेगाराला शिक्षाही होणारच असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.मात्र, या प्रकरणावरून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा का मागू नये असा सवाल उपस्थित केला.अनिल देशमूख यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिल आहे.वसुलीचे आरोप असणाऱ्यांवर काय प्रतिक्रिया द्यायची, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवी यांनी अनिल देशमुखांना लगावला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत लिहिले की, देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील…आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी).देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
पवार, राहुल गांधींना लोणी का लावतायत?
‘अमोलला बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता’
बांगलादेशच्या खासदाराचा भारतात गूढ मृत्यू !
विशाल अग्रवालसह तिघांना तीन दिवसीय पोलीस कोठडी!
या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असेल.आणि त्यांच्या सरकारच्या काळात कोर्टाने एफआयआर दाखल केला असेल अशा व्यक्तींच्या वक्तव्यावर माझ्याकडून का प्रतिक्रिया मागता?, असा टोला अनिल देशमुखांना लगावला.
दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.पोलिसांनी चौकशीसाठी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.मात्र, न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालसह तिघांना २४ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.