अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज(४ एप्रिल) अमरावती दौऱ्यावर असताना तेथील सभेला त्यांनी संबोधित केलं अन नवनीत यांचे जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवल्याची बातमी जनतेला सांगितली.महाविकास आघाडीच्या काळात नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर बोट ठेवण्यात आलं होतं.तसेच हनुमान चालीसा पठण केल्यामुळे नवनीत राणा याना १४ दिवस तुरुंगात देखील जावे लागले होते.या संपूर्ण घटनेचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात उल्लेख करत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.तसेच पंतप्रधान मोदींच्या कार्याचा गौरव करत मोदीजींनाच मतं टाकण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केलं.

ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगलाच होतो
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलं आहे.सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र पूर्णपणे वैध ठरवलं आहे.अखेर सत्याचा विजय झाला असून जे लोक विरोधात बोलत होते त्यांच्या तोंडावर झापड बसली आहे.ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील चांगलाच होतो.आता नवनीत राणा प्रचंड मताने निवडून येऊन खासदार होणार आहेत यामध्ये काहीच शंका नाही.

नवनीत राणा यांच्यावर प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद
जे बोलतात त्यांना उत्तर देण्याची गरज नाही.तुमचा हुनर अमरावतीने पाहिला आहे.दिन दलित, गोर गरीब, आदिवासी , शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, अल्पमजुर या सर्वांची सेवा करताना पाच वर्ष सर्वानी तुम्हाला पाहिलं आहे.त्यामुळे कोणीही तुमच्यावर टिप्पणी केली तरी चिंता करू नका, केवळ मत मागा, जनतेचा आशीर्वाद मागा, तुमच्या पाठीशी पुण्याई आहे.नवनीत राणा यांच्यावर प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे.

हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाहीतर काय पाकिस्तानत म्हणायची का?
देशामधील एक व्यक्ती दाखवा जो भारतामध्ये हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि ज्याला १४ दिवस जेलमध्ये राहावं लागलं.या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना मला विचारायचं आहे की, उद्धव ठाकरे मला सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाहीतर काय पाकिस्तानत म्हणायची का?,असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.

शक्तींना संपवायला निघणारे स्वतःच संपतील
महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे ते बघा.राहुल गांधी म्हणतात की, हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करणा है.माझी आई अंबाबाई हिंदू समाजातील शक्ती आहे, दुर्गामाता इथे सभेला बसलेल्या या सर्व महिला हिंदू समाजातील शक्ती आहेत.अन या शक्तीला समाप्त करण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत.राहुल गांधी इतकचं लक्षात ठेवा या शक्तीला संपवण्यासाठी कित्येक जण आले अन गेले मात्र या शक्तीला कोणीही संपवू शकले नाही.

कारण या देशात नाहीतर पृथ्वीतलावर जो माणूस जन्माला येतो तो केवळ शक्ती मुळे जन्माला येतो. आई रुपी शक्ती त्याला जन्माला घालते म्ह्णून माणूस जन्माला येतो.छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती.आमचीही शक्ती आई जिजाऊ आहेत.त्यामुळे राहुल गांधी आणि हे महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी नवनीत राणा याना हनुमान चालीसा म्हटले म्ह्णून १४ दिवस तुरुंगात पाठवणारे आम्हाला संपवायची बात करत आहेत.हे सर्व संपतील मात्र आम्हाला संपवू शकत नाहीत.

हे ही वाचा:

काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक
ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही,महापालिकेची नाही, नवनीत राणा यांची देखील नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे.देशाचा नेता कोण असेल, देशाचे नेतृत्व कोण करेल, कोण या देशाला मजबूत करू शकत? याची ही निवडणूक आहे आणि देशाच्या जनतेने ठरवलं आहे की या देशाची कमान मोदीजींच्या हातीच द्यायची. तिसऱ्यांदा आपण मोदीजींना निवडून देणार आहोत.कारण देशामध्ये मोदीजींनी गरिबीचा अजेंडा चालवला.एक असा पंतप्रधान आहे ज्याने जात, धर्म, पंत, भाषा,पाहिली नाही. मोदीजींनी सांगितलं आहे, गरीब कुठल्याही जातीचा,धर्माचा असो, त्याला आम्ही घर, वीज, पाणी, गॅस, शौचालय, कर्ज देईन, मी त्याला त्याच्या पायावर उभे करिन.

मोदीजींनी १० वर्षात काय चमत्कार केला अन २५ कोटी गरीब हे गरिबीच्या रेषेच्या बाहेर आले.जगाच्या पाठीवर जे मोठं-मोठ्या अर्थशात्रज्ञांना जे जमले नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर करून दाखवलं. २५ कोटी गरीब लोकांना गरिबीच्या रेषेच्या बाहेर काढलं.जगभरातील अर्थशास्त्रज्ञ देखील अचंबित आहेत. ते स्वतः म्हणतात हे कस काय शक्य झालं, हे आम्हाला देखील समजत नाही.एक संवेदना होती, गरिबाकरिता काम करण्याची ईच्छा होती, जीवनातील प्रत्येक क्षण, रक्तातील प्रत्येक थेंब हा गरिबाला समर्पित होता.त्यामुळेच हे सर्व मोदीजी करू शकले.

महिला राज मोदीजी आणणार
२५ कोटी लोक जे झोपडीत राहायचे ते आज पक्क्या घरात राहतात.५० कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचे पाणी नेण्याचे काम केलं, ३५ कोटी लोकांच्या घरी वीज देण्यात आलं, हे सर्व मोजींमुळेच झालं.इथून पुढे महिलांचे देखील तेवढंच वर्चस्व असणार आहे, तसे मोदीजींनी सांगितले आहे.कारण मोदीजींनी सांगितले आहे की, २०२९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ३३ टक्के महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेमध्ये ३३ टक्के महिला खासदार, महिला राज मोदीजी आणणार आहेत.महिलांचा आशीर्वाद मोदीजींना आहे.पंतप्रधान मोदींनी ३१ कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं.त्यामुळे ३१ कोटी परिवार आपल्या पायावर उभे राहिले.

८३ लाख बचत गटांना ८ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले अन म्हणाले, माझ्या महिला जेव्हा पायावर उभ्या राहतील तेव्हा माझा देश समृद्ध बनेल.१६ हजार कोटी रुपयांची योजना आदिवासीयां करिता तयार केली.प्रत्येक समाजाला मोदींचीची मदत मिळाली आहे.त्यामुळे आता आपलं एक कर्तव्य आहे, मोदीजींनी आपल्याकरीता काम केलं आहे.मोदीजींना आता आपण आशीर्वाद देण्याची संधी आहे.आपण जेव्हा कमळाचं बटन दाबू तेव्हा ते नवनीत राणा यांना नाहीतर थेट मोदीजींना ते मत जाईल.त्यामुळे तुम्हाला आता ठरवायचं आहे की मत कोणाला करायचं आहे.नवनीत राणा यांना मत द्या आणि रेकॉर्ड ब्रेक करा, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Exit mobile version