ऑक्सिजन, रेमडेसीवीरसाठी ठाकरे सरकारने काय केले?

ऑक्सिजन, रेमडेसीवीरसाठी ठाकरे सरकारने काय केले?

महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानाला केवळ ठाकरे सरकारचा ढीम्म कारभार जबाबदार आहे, असा आरोप भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ९ फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची टक्केवारी ४६ टक्क्यांवर गेली असताना ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरबाबत महाराष्ट्रातील कंपन्यांशी ठाकरे सरकारने करार का नाही केला असा सवाल त्यांनी केला.

राज्यात ऑक्सिजन आणि रेमडसीवीरचा तुटवडा असल्यामुळे लोकांचे बळी जात आहेत. अहमदनगरमध्ये १२ हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे काल बुधवारी लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. अनेक ठिकाणी हीच परीस्थिती आहे. ठाकरे सरकारचा गलथान कारभार याला पूर्णपणे जबाबदार असल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

हे ही वाचा:

मोदींचे आज जागतिक पर्यावरणीय बदल परिषदेत संबोधन

सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे

माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन

भारतीय लसी कोविडवर ठरल्या भारी

महाराष्ट्रात ऑक्सिजनची सर्वाधिक उत्पादन करणारी आय़नॉक्स कंपनी आहे, सिप्लाचा रेमडेसीवीरचा प्लांट आहे. परंतु राज्यात कोरोनाची लाट येणार हे स्पष्ट झाले असताना ठाकरे सरकार हातावर हात ठेवून बसले. या कंपन्यांशी बोलण्याची औपचारीकता दाखवली असती तर राज्यात मृत्यूचे हे तांडव झाले नसते असा आरोप भातखळकर यांनी केला.

कोरोना रुग्णांना दिलासा द्यायचा सोडून राज्य सरकारचे मंत्री केवळ आणि केवळ खोटे नरेटीव्ह सेट करण्यात वेळ वाया घालवत आहेत, केंद्र सरकारकडून मदत येत असताना रोज खोटेनाटे आरोप करीत आहेत. राज्याला मदत करण्याची इच्छा बाळगणा-यांच्या मागे खोट्या पोलिस चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले जात आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील जनतेची परीस्थिती विषण्ण करणारी आहे. ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचे बळी जाणे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात लाजिरवाणे असल्याचे त्यांनी सांगितले

Exit mobile version