व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबरमध्ये जी- २० देशांच्या शिखर बैठकीसाठी इटली येथे गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचे आलिंगन देतानाचे फोटो समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाल्याचे आणि त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मोदी यांनी म्हटले होते. तसेच त्यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आज गोवा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी गोव्यामध्ये जनतेला संबोधित केले तेव्हा त्यांनी त्यांची आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीची आठवण सांगितली. पोप फ्रान्सिस यांना निमंत्रण देताच “तुम्ही मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे”, असे पोप म्हणाले होते, असे मोदी यांनी सांगितले. भारताच्या विविधतेबद्दल आणि आपल्या लोकशाहीवर पोप फ्रान्सिस यांचे प्रेम असल्याचे मोदींनी सांगितले.

हे ही वाचा:

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या

महाविकास आघाडीचं सरकार दारू विकणाऱ्यांचं, दारू पिणाऱ्यांचं!

गोवा मुक्ती संग्रामात वीरमरण आलेल्या संघ स्वयंसेवकांची गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोवा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सध्या गोव्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. मोदींच्या या सभेला लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. भाषणाची सुरुवात करताना मोदींनी नागरिकांना गोवन भाषेत शुभेच्छा दिल्या. मोदींनी दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांनाही श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version