द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने उद्धव ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे.भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. एका राष्ट्राचा अर्थ होतो, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हा ते एक राष्ट्र असतं. परंतु, भारत एक राष्ट्र नाही. भारत एक उपखंड आहे. तसेच तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही. आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत. माझा रामायणावर आणि रामावर विश्वास नाही,” असं वक्तव्य ए. राजा यांनी केलं होतं.या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष करून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे हे इंडी आघाडी मध्ये सामील आहेत.इंडी आघाडीतील नेते सारखे सनातन धर्मावर बोट ठवून गरळ ओकण्याचे काम करत असतात, यावर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत लिहिले की,भारत हे एक राष्ट्र नाही, अशी भारतविरोधी भूमिका, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा कधीच स्वीकार करणार नाही, ही राक्षसी महत्वाकांक्षा आणि राम किंवा रामायणावर विश्वास नाही.. असा माज करणारे द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा कसला राजा हा तर भिकारी!! हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे दिवटे कर्नाटकचे मंत्री प्रियांक करतात.
हे ही वाचा:
“प. बंगाल सरकारला संदेशखालीतील घटनेचा काहीही फरक नाही; आरोपींना वाचवण्यासाठी बळाचा वापर सुरूये”
आदम सेनेने शरियाचे उल्लंघन केल्याबद्दल मुस्लिम मुलींना धमकावले
रणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!
झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!
सनातन हिंदू धर्माचा अपमान इंडी आघाडीतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी करतात… आणि आत्ता ए. राजा यांनी हद्दच केली. राष्ट्रविरोधी विधान करून आमचे आराध्य प्राणप्रिय प्रभू श्रीराम, रामायण आणि महावीर हनुमंताचे अस्तित्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेजी, हेच आहेत ना तुमचे मित्र आणि नवे नेते.. सावरकरांचा अपमान तुम्ही मिंधे होऊन सहन केला. आता भारतमाता, प्रभू श्रीराम, रामायण आणि हनुमानाचा अपमान तुमचे निर्लज्ज सवंगडी करू लागले…यासाठीच तुम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली, बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब लिहू दिले. अरेरे, तुमच्याबद्दल आता कणव वाटू लागली आहे.