काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खरमरीत सवाल

काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?

कर्नाटकात काँग्रेसने सत्तेत येताच मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील काही बदलांबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अभ्यासक्रमातून एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातून तुम्ही सावरकर, हेडगेवार आणि कोणतेही स्वातंत्र्यसेनानी काढू शकत नाही. काँगेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसर काही अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांच लांगुलचालन करण्याकरिता कर्नाटकचं सरकार हे निर्णय घेत आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच का ? असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.

कर्नाटकात अभ्यासक्रमात बदल केला त्यावर उद्धव ठाकरे तुमची प्रतिक्रिया काय ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते सावरकरांच नाव पुसायला निघाले आहेत. धर्मांतरणाला समर्थन देत आहेत यावर तुमचं मत काय? सत्तेकरीता तुम्ही हा समझौता केला, हे यातून स्पष्ट होत आहे, अशी सणसणीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

हे ही वाचा:

चक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’

पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ५० हजार फुटांवरून टिपणार

आशिया कपमध्ये बुमराह, श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता

मणिपूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कर्नाटकातील अभ्यासक्रम बदलावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी लंडन मधूनच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का? उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे,’ असं बावनकुळे म्हणाले.

अतुल भातखळकर यांचा काँग्रेसवर निशाणा

धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करून काँग्रेसने आपल्या हिंदूद्वेशी मानसिकतेचा पुन्हा एकदा परिचय दिला आहे.काँग्रेस म्हणजे हिंदूंचा विश्वासघात. निवडणुकीत काँगेसला याची जबर किंमत मोजावी लागेल, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

 

Exit mobile version