“आदित्य ठाकरेंनी निदान अभ्यास करून बोलावं. मात्र, आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय?” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना माध्यमांशी संवाद साधताना लगावला.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बारसू प्रकरणावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर देताना म्हटले की, “नाणार असो की बारसू असो. भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतं आहे. त्याबरोबरच मिंधेंचे सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं दिसत आहे. यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशासाठी? पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग अशा गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत? उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील,” असं ट्वीट त्यांनी केलं.
हे ही वाचा:
कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण
नासामध्ये नोकरी देतो सांगून १११ जणांकडून लुबाडले कोट्यवधी रुपये
नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही
मणिपूरवर राज्यसभेत ११ ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता
यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “किमान आदित्य ठाकरे यावर अभ्यास करून बोलतील, असे वाटलं होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय?” देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असून तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं. सामनामधून भाजपावर टीका करण्यात आली आहे. याबाबती विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देत म्हटले की, “मी सामना वाचत नाही.”