काय आहे नार्कोटिक जिहाद?

काय आहे नार्कोटिक जिहाद?

नार्कोटिक जिहाद असा दावा करणाऱ्या केरळच्या बिशपने आता म्हटले आहे की धर्मनिरपेक्षता राज्याला सांप्रदायिक मार्गावर नेऊ शकते. गांधी जयंतीनिमित्त चर्चच्या मुखपत्रात लिहिताना जोसेफ कलरंगट्ट म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेचा फायदा कोणाला होतोय? यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पलाय बिशप यांनी गेल्या महिन्यात एका सत्रात दावा केला होता की, लव्ह जिहाद व्यतिरिक्त, नार्कोटिक जिहाददेखील सुरु केला जात आहे. जेणेकरून बिगर मुस्लिमांना ड्रग्जची सवय लागेल.

या वक्तव्यामुळे मुस्लिम संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कॅथोलिक बिशपने आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली जात आहे. सत्ताधारी माकप तसेच विरोधी काँग्रेसने हे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी हे विधान फेटाळण्यासाठी सरकारी आकडेवारी उपलब्ध करेल असे सांगितले आहे.

परंतु शनिवारी प्रकाशित झालेल्या कलरंगट्ट यांच्या लेखात म्हटले आहे की, “आज जी चिंता आहे ती म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष मार्गाने प्रवास करून सांप्रदायिक केरळ बनवतोय का? धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या प्रकाशात स्वतःच्या समाजाचा निषेध केला पाहिजे असा ठराविक व्यक्तींचा आग्रह आहे. धर्मनिरपेक्षतेचा फायदा कोणाला होतो हा प्रश्न अनेक स्तरातून उपस्थित होतो.”

हे ही वाचा:

 

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

अमेरिकेतील मृतांचा आकडा पोहोचला सात लाखांवर

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

“जर आपण भारतीय धर्मनिरपेक्षता त्याच्या उदात्त अर्थाने आत्मसात केली पाहिजे.” असं बिशप कलरंगट्ट म्हणाले. बिशप म्हणाले की, “जे लोक चुकांविरुद्ध बोलत नाहीत ते शांत राहून सामाजकंटकांना प्रोत्साहन देत आहेत. समाजकंटकांविरुद्ध हातमिळवणी करून धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिक एकात्मता ढासळू शकते. धर्मनिरपेक्षता भारतासाठी मौल्यवान आहे, परंतु खोटी धर्मनिरपेक्षता देशाचा नाश करेल.”

Exit mobile version