काय घडले चन्नी-शहा भेटीत?

काय घडले चन्नी-शहा भेटीत?

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी उत्तर प्रदेशातील हिंसाचार आणि शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते.

“हे तीन शेतीविषयक कायदे लवकरात लवकर रद्द केले जावेत आणि यासारख्या घटना (उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी) टाळणे आवश्यक आहे. मी आजच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या विषयावर चर्चा करेन.” असं चन्नी यांनी चंदीगड येथे पत्रकारांसमोर सांगितले.

रविवारी लखीमपूर खेरीच्या घटनेत तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले. संयुक्त शेतकरी किसान मोर्चाने, या घटनेत चार शेतकऱ्यांना आपला जीव गमावल्याचा आरोप केला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चन्नी यांची बैठक लखीमपूर खेरीला जाण्यास परवानगी नाकारण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आली. तर उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा आणि काही काँग्रेस आमदारांना हरियाणा-यूपी सीमेवर रोखल्यानंतर त्यांना “ताब्यात” घेण्यात आले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लखीमपूर खेरी घटनेतील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन केले. केंद्राचे तीन ‘विवादास्पद’ शेती कायदे रद्द करण्याची गरजही पुन्हा व्यक्त केली.

हे ही वाचा:

कोणाला मिळालं ‘हेलीकॉप्टर’ आणि कोणाला ‘शिलाई मशीन’?

मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदींशी त्यांची पहिली भेट झाली. ज्यात त्यांनी केंद्राला तीन ‘वादग्रस्त’ कायदे मागे घेण्यास सांगितले, ज्याच्या विरोधात हजारो शेतकरी – मुख्यतः पंजाब आणि हरियाणामधील – जवळपास एक वर्षापासून आंदोलन करत आहेत .

Exit mobile version