अशोक चव्हाण-फडणवीस भेटीत काय झालं?

देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

अशोक चव्हाण-फडणवीस भेटीत काय झालं?

दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर राज्यात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा होत आहे. यावेळी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा सुरु झाल्या आहेत. अशीच भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची झाली होती. त्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होत. अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

भाजपा नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. आशिष कुलकर्णी हे अशोक चव्हाण यांचे मित्र असल्याकारणाने त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस देखील दर्शनासाठी तिथे पोहोचले होते. त्यावेळी या दोन नेत्यांमध्ये १५ ते २० मिनिटे चर्चा रंगली होती. त्यांच्या चर्चेनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चेवर देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनी पडदा टाकला आहे. आमची भेट राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरण दोघांनी दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला चव्हाण पोहोचले, मी पण तिथे पोहोचलो. ते गणपतीचे दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोहोचलो. अशा भेटी तर सगळ्यांच्याच होतात. पण अशोक चव्हाण आणि माझी विशेष अशी कोणतीही भेट झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

‘भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत’

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव

महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार

मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा

मात्र या भेटीनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. अशोक चव्हाण हे भाजपासोबत येतील असेही बोलले जाऊ लागले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते मतदानासाठी पोहोचू शकले नाहीत. त्यावरूनही संशय व्यक्त केला जात होता. या अगोदरसुद्धा काँग्रेसचे नेते माजी मंत्री अस्लम शेख त्याचबरोबर संग्राम थोपटे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावरून सुद्धा काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आले होते.

Exit mobile version