काय घडलं अमित शहा-अमरिंदर सिंग भेटीत?

काय घडलं अमित शहा-अमरिंदर सिंग भेटीत?

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काल संध्याकाळी पहिल्यांदाच कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत येऊन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.

सिंग-शहा यांच्या भेटीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपामध्ये येण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषी मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

हे देखील समोर आले आहे की भाजपाचे केंद्रीय नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपामध्ये सामील करून करण्यास नकार दिला तर सिंग यांना नवीन राजकीय भूमिकेत शिरण्यासाठी मदत करू शकते. अशाप्रकारे, सिंग हे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा भाग होण्यासाठी राजी होतील. तथापि, या गोष्टीची कोणत्याही प्रकारे अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही आणि या तूर्तास या केवळ चर्चाच आहेत.

हे ही वाचा:

‘ही’ भागीदारी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात क्रांती आणेल

‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करावी’…काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

..आणि रोहित शर्माने क्रिकेट रसिकांच्या हृदयात घर केले

भाजपा आणि एनडीएचे अनेक वरिष्ठ नेते- अनिल विज आणि आरपीआयचे रामदास आठवले यांनी सिंह यांना भाजपा किंवा एनडीए आघाडीचा भाग होण्याचे आमंत्रण दिले होते. “केवळ अमरिंदर सिंगच नाही, तर पंजाबमधील सर्व राष्ट्रवादी शक्तींनी” काँग्रेसच्या गेम प्लॅनला पराभूत करण्यासाठी “एकत्र यायला पाहिजे” असे हरियाणा मंत्री विज म्हणाले होते.

त्यांच्या आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीपीसीसी) प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात अनेक महिन्यांच्या भांडणानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Exit mobile version