केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर काँग्रेसने अमरिंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. आधीच अडचणीत अडकलेल्या काँग्रेस पक्षातून आणखी एक मोठा नेता बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबिका सोनी आणि कमलनाथ अमरिंदर सिंग यांना मनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगितले जात आहे. परंतु मंगळवारपासून दिल्लीत आलेल्या कॅप्टनने त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही भेट मागितलेली नाही.
माजी मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय गोंधळादरम्यान त्यांनी पंजाबसारख्या सीमावर्ती राज्याच्या सुरक्षेवर चर्चा केली असावी, असे सांगण्यात आले आहे.
काँग्रेसच्या या दिग्गजाने पक्षाला धारेवर धरले आहे. राज्य निवडणुकीच्या चार महिने अगोदर १८ सप्टेंबरला पंजाबचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाग पाडल्यानंतर ते आपल्या पर्यायांचा शोध घेत असल्याची शक्यता नाकारत नाही.
मंगळवारी दिल्लीत उतरल्यावर त्यांनी भाजपच्या नेत्यांना भेटण्याची कोणतीही योजना नसल्याचा दावा केला होता. त्यांना फक्त नवीन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासाठी कपूरथला हाऊस रिकामे करायचे आहे.
हे ही वाचा:
लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!
मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….
बँकेतून होणारे ऑटो डेबिट बंद! वाचा काय आहेत नवीन नियम
अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?
अमित शहा यांच्याशी त्यांची भेट अखेर काल संध्याकाळी झाली. एक तासाच्या बैठकीनंतर, कॅप्टन म्हणाले की त्याने ११ महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी कायद्यांवर चर्चा केली आहे. ते म्हणाले की त्यांनी शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी आणि पिकांची विविधता वाढवण्यासाठी पंजाबला सहकार्य करण्यासाठी अमित शाह यांना आग्रह केला.