23 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरराजकारणदहावीची परिक्षा रद्द करताना कोणते समीकरण सोडवत होते?

दहावीची परिक्षा रद्द करताना कोणते समीकरण सोडवत होते?

Google News Follow

Related

राज्यात कोविडचे रुग्ण वाढू लागल्यामुळे सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. त्याबरोबरच सरकारने धडाक्याने निर्णय घेत दहावीची शालांत परिक्षा देखील रद्द केली होती. मात्र त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचा नवा प्रश्न निर्माण झाला. त्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यास ठाकरे सरकार संपूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. दहावीच्या परिक्षेबाबत कोणतेही निर्णय न घेण्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता घिसाडघाईने दहावीच्या परिक्षा रद्द केल्यामुळे अकरावीच्या प्रवेशांबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणत्या मार्गाने विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करायचे याबाबत काही स्पष्टता नाही. उच्च न्यायालयात याबाबत माहिती देताना सरकारने दहावीच्या निकालांसाठी काही सूत्र ठरले नसल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.     त्यामुळे शालांत परिक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकूणच संभ्रमाचे वातावरण सरकारने निर्माण करून ठेवले आहे. याबाबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा:

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

टोकियो ऑलिम्पिक रद्द करा, स्थानिक डॉक्टरांची मागणी

बंगालमधील अराजकता लोकशाही मूल्यांचा अस्त करणारी

भिवंडीतून १२००० जिलेटीन काड्या, ३००८ डेटोनेटर जप्त

ट्वीटवरून टीका करताना भातखळकरांनी दहावीची परिक्षा रद्द करताना कोणते समीकरण सोडवत होते? असा सवाल देखील केल आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात,

परीक्षा-निकालाचा घोळ, शिक्षणाचा बट्ट्याबोळ…दहावीच्या निकालाचे सूत्रही तिघाडी सरकारला सापडेनासे झालेय. आजचा निर्णय उद्यावर हीच कामाची पद्धत बनलेले मुख्यमंत्री दहावीची परीक्षा रद्द करताना कोणते समीकरण सोडवत होते?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा