महाराष्ट्रामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात लसीकरण देखील वेगाने होणे आवश्यक आहे. ठाकरे सरकार कडून आता लस उपलब्धच होत नसल्याची थाप देखील मारली जात आहे. यावरून ठाकरे सरकावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र डागले आहे.
महाराष्ट्रात लसीकरण वाढवण्यासाठी आणि १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणासाठी १२ कोटी लसी एकरकमी खरेदी करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र यावेळी त्यांनी लसच उपलब्ध नसल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे मुंबईतील बड्या रुग्णालयांत ‘विशेष पाहुण्यांसाठी’ लस उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
हे ही वाचा:
सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी
अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट
अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला
‘इंडियन व्हेरीअंट’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर गुन्हा
ट्वीटरवरून ठाकरे सरकारव तोफ डागताना ठाकरे सरकारने केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले असा सवाल केला आहे. त्याबरोबरच अनेक राज्यांनी एक कोटी लस खरेदीसाठी आगाऊ रकमा दिल्या असल्याचे देखील त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आमदार अतुल भातखळकर त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात,
मुख्यमंत्री म्हणतायत लस नाही म्हणून खरेदी नाही. किती खोटं बोलताय? मुंबईतील बड्या खासगी हॉस्पिटलना लस मिळते आणि सरकारला मिळत नाही असे कसे? अनेक राज्यांनी एकेक कोटी लसी विकत घेण्यासाठी आगाऊ रक्कम दिली आहे, तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?
मुख्यमंत्री म्हणतायत लस नाही म्हणून खरेदी नाही. किती खोटं बोलताय @OfficeofUT?
मुंबईतील बड्या खासगी हॉस्पिटलना लस मिळते आणि सरकारला मिळत नाही असे कसे?
अनेक राज्यांनी एकेक कोटी लसी विकत घेण्यासाठी आगाऊ रक्कम दिली आहे, तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले? pic.twitter.com/pWe2fplKJM— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021