25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणमिठी नदीतील पुराव्यांवर काय बोलला सचिन वाझे?

मिठी नदीतील पुराव्यांवर काय बोलला सचिन वाझे?

Google News Follow

Related

मिठी नदीतून काल सापडलेल्या अनेक पुराव्यांवर आज सचिन वाझेचे विधान समोर आपले आहे. सचिन वाझेला एनआयएने घटनास्थळी नेले होते. तिथे सापडलेले पुरावे दाखवल्यावर सचिन वाझेने यातील काही पुरावे स्वतःच मिठी नदीत टाकल्याचे मान्य केले.

रविवारी एनआयएला अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. मुंबई येथील मिठी नदीत हे पुरावे सापडले आहेत. सचिन वाझे याने हे पुरावे नष्ट करायच्या हेतूने मिठी नदीत टाकले होते. पण मनसुख हिरेन यांची हत्या होईपर्यंत हे पुरावे वाझेच्याच ताब्यात असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. मनसुख ह्याच्या हत्येनंतरच वाझेने हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख प्रकरणाचा तपास करत असताना सचिन वाझेने या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाचे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केल्याची बाब एनआयएच्या समोर आली होती. यातले काही पुरावे मुंबई येथील बीकेसी परिसरात मिठी नदीत फेकल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. रविवारी एनआयएचे पथक सचिन वाझेला घेऊन मिठी नदी परिसरात पोहोचले. यावेळी सचिन वाझेच्या उपस्थिती उतरून तपास करण्यात आला. एनआयएच्या या प्रयत्नाला यश आले आहे.

हे ही वाचा:

मनसुखची हत्या होईपर्यंत अंबानी प्रकरणातले पुरावे होते वाझेच्याच ताब्यात

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

एनआयएच्या या तपासात गाडीच्या दोन नंबरप्लेट्स सापडल्या आहेत. या दोन्ही नंबरप्लेट्सचा नोंदणी क्रमांक एकच आहे. या सोबतच कॉम्पुटरचा सीपीयू, डीव्हीआर आणि इतर काही गोष्टी सापडल्या आहेत. सापडलेले डीव्हीआर हे वाझे राहात असलेल्या इमारतीचे आहेत जिथे १७ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत मनसुखची स्कॉर्पिओ उभी होती. यासोबत काही दुकानांचेही फुटेज आहे जिथे वाझेने वेगवेगळ्या नंबरप्लेट्स बनवून घेतल्या. हे सर्व पुरावे मनसुख ह्याच्या हत्येपूर्वी वाझे याच्याच ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा