कोळसा संकटावर काय म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री?

कोळसा संकटावर काय म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री?

ऊर्जा मंत्रालय आणि विद्युत वितरण कंपन्या बीएसईएस आणि टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी रविवारी सांगितले की दिल्लीमध्ये वीज पुरवठ्याबाबत कोणतेही “संकट” नाही.

दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी इशारा दिला की, पुढील दोन दिवसात राष्ट्रीय राजधानीला ब्लॅकआऊटचा सामना करावा लागेल. विजेची मागणी अपेक्षेपेक्षा वेगाने वाढत असताना, देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोळशाच्या अत्यंत कमी पुरवठ्याशी झगडत आहेत. देशातील एकूण १३५ औष्णिक वीज केंद्रांपैकी १२६.८ गिगावॅट क्षमतेचे १०४ थर्मल प्लांट्स सध्या एका आठवड्यापर्यंत कोळसा साठा “क्रिटिकल” किंवा “सुपर क्रिटिकल” पातळीवर वर्गीकृत आहेत. ८९.५ गिगावॅट क्षमतेच्या एकूण ७२ प्लांट्समध्ये १४ दिवसांच्या स्टॉकच्या साठ्याऐवजी केवळ तीन दिवस किंवा त्यापेक्षा कमी कोळसा साठा आहे.

तथापि, रविवारी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले की, “आमच्याकडे सरासरी कोळसा साठा (वीज केंद्रांवर) आहे जो चार दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो. हा साठा दररोज भरला जातो.” असे सांगून ते केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

काय आहे पीएम गती शक्ती योजना?

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

 

केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय राजधानीतील संभाव्य वीज संकटाबद्दल दिल्लीच्या चिंताही फेटाळल्या. “दिल्लीला आवश्यक प्रमाणात वीज पुरवली जात आहे आणि ती सुरूच राहील.” असं सिंह म्हणाले.

Exit mobile version