केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केली होती. यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेल्यांच्या हाती देशाचे गृहमंत्रीपद आहे, असं शरद पवार म्हणाले. यावरून आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर घाणाघाती टीका केली आहे.
“शरद पवार हे वैफायल्यातून टीका करत आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते असूनही अशी टीका करतात. शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपीला विमानातून आणलं होतं. यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही,” असा सवाल विचारात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या काळात एकही काम केलं नाही. मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी काय केलं? त्यांनी याबद्दल सांगावं. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची. त्यांचा हा धंदा लोकांनी पहिला आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
हे ही वाचा..
बंगळूरूमधील वसतिगृहात तरुणीची गळा चिरून हत्या करणाऱ्याच्या मध्य प्रदेशातून आवळल्या मुसक्या
काँग्रेस आमदाराने विधानसभा अध्यक्षांबद्दल वापरले अपशब्द
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा दिमाख
जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान हुतात्मा
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कांदा निर्यातीबद्दलही वक्तव्य केले. निर्यात मूल्य कमी झाले पाहिजे असा एक वर्ग असून कांदा व्यापाऱ्यांना त्यांनी शेतकाऱ्यांना वेठीस धरलं आहे. निर्यात मूल्य कमी होऊन अधिक कांदा निर्यात झाला पाहिजे. यासाठी पियुष गोयल यांना विनंती केली आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.