पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज(३० एप्रिल) माढ्यात सभा पार पडली.महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सोलापुरातील माळशिरस येथे सभा पार पडली.यावेळी पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित करताना आपल्या कार्यकाळातील केलेल्या कामाचा उल्लेख करत नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला.ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नेता कृषिमंत्री होता तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?, असा सवाल शरद पवारांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी केला.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली.छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, बाळूमामांच्या नावाने चांगभलं, हर हर महादेव, महाराष्ट्राचे कुलदैवत रखुमाईला माझे नमन.संतांच्या पावन भूमीत मी तुमच्याकडून विकसित भारतासाठी आशीर्वाद मागणीसाठी आलो आहे.काँग्रेसची ६० वर्ष सत्ता होती काँग्रेसने एवढ्या मोठ्या काळात के काही करू शकले नाही ते केवळ तुमचा सेवक मोदीने करून दाखवले, असे मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले आहे. जवळपास ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे. देशातील विकासकामे मोठ्या जोमात सुरू आहे. याचं पुण्य माझं नाही, तर मला निवडून देणाऱ्या लोकांचं आहे.पायाभूत सुविधांवर काँग्रेसने ६० वर्षात जेवढा निधी खर्च केला, तेवढा निधी आम्ही १० वर्षात खर्च केल्याचं मोदींनी म्हटलं. माढ्यात पाणी देणार असं आश्वासन १५ वर्षांपूर्वी एका नेत्याने दिलं होतं. यासाठी त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ देखील घेतली. पण तो नेता अजूनही या भागात पाणी पोहचू शकला नाही, अशी टीकाही मोदींनी केली.
हे ही वाचा:
नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!
‘मोदी पाठून हल्ला करत नाही जे करतो ते उघडपणे करतो’
“भारत जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतोय तर, पाकिस्तान दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागतोय”
केनियामध्ये धरण फुटून ४० हून अधिक व्यक्तींचा मृत्यू
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या केंद्रीय कृषीमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. देशात काँग्रेसचे सरकार असताना येथील मातब्बर नेते देशाचे कृषीमंत्री होते. तेव्हा ऊसाच्या एफआरपीचा दर २०० रुपये इतका होता. मात्र, आज मोदी सरकारच्या काळात उसाचा एफआरपी प्रतिक्विंटल ३४० रुपये इतका आहे. हा मातब्बर नेता कृषीमंत्री होता तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकलेल्या बिलांचे पैसे मिळवण्यासाठी साखर आयोगाच्या कार्यालयात खेटे मारायला लागायचे. मात्र, आज देशात ऊसाचा थकित एफआरपी १०० टक्के दिला जातो. २०१४ मध्ये ऊसाच्या थकित एफआरपीसाठी ५७ हजार कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली होती. यंदा हीच रक्कम १ लाख १४ कोटी इतकी आहे. त्यापैकी ३२ हजार कोटी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देशात नव्वदीच्या दशकापासून प्राप्तिकरामुळे साखर कारखाने त्रस्त होते. साखर कारखान्यांना आयकराच्या जाचातून सोडविण्यासाठी मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार यांना याबाबत अनेक पत्र लिहिली.पण कृषीमंत्री असताना २०१४ पूर्वी शरद पवारांनी ही समस्या सोडवली नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.ते पुढे म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर या सर्व समस्या निकाली काढल्या.आम्ही साखर कारखान्यांना १० हजार कोटींचा दिलासा देऊन जुना प्राप्तीकर माफ केला. याचा मोठा फायदा ऊस उत्पादकांना मिळाला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.