पंतप्रधानांच्या ‘या’ वाक्यावर हसले नर्स आणि डॉक्टर…

पंतप्रधानांच्या ‘या’ वाक्यावर हसले नर्स आणि डॉक्टर…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविड-१९ विरोधातील लसीचा पहिला डोस आज घेतला. आजपासून भारतात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५-५९ वयोगटातील सहाव्याधी व्यक्तींनाही लस मिळणार आहे. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस देण्याऱ्या नर्सला असा एक प्रश्न विचारला की त्यावेळी खोलीत असलेल्या सर्वांनाच हसू आलं.

हे ही वाचा:

मोदींनीही घेतली कोविडची लस

लस घेण्यासाठी खुर्चीत बसल्यावर मोदींनी पुद्दुचेरीच्या नर्स पी. निवेदिता यांना विचारलं की, “लस टोचायला आणलेली सुई साध्या रुग्णालयातून आणली आहे का पशूंच्या?” मोदींनी हा प्रश्न विचारताच त्यावेळी खोलीत असलेले सर्व हसू लागले. पुढे मोदी असंही म्हणाले की, “राजकारण्यांची कातडी फार जाड असते, त्यामुळे कदाचित जनावरांच्या रुग्णालयात वापरण्यात येणारी सुई लागेल.” मोदींच्या या वाक्यावर पुन्हा एकदा सर्वांना हसू अनावर झाले.

हे ही पाहा:

शरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी

एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कोणी काही बोलल्यामुळे किंवा अगदी समाज माध्यमांमधून एखादे कार्टून शेअर केल्यामुळे शिवसैनिक जनतेची मारहाण करतात. हे असे प्रसंग अगदी गेल्याच वर्षात आपल्याला जोगेश्वरी आणि पंढरपूरमध्ये बघायला मिळाले होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःवरच विनोद करतात. या दोन नेत्यांमधला आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधला हा मोठा फरक या उदाहरणांमधून दिसून येतो.

Exit mobile version