२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!

भाजपा नेत्यांनी व्हिडीओ शेअर करत केली टीका

२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवार, २ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केले. गेले अनेक महिने या विधेयकावरून राजकीय वर्तुळात गोंधळ माजला होता. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. हे विधेयक सादर झाल्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एनडीए सरकार या विधेयकाच्या बाजूने आहे तर संपूर्ण ‘इंडी’ आघाडी या विधेयकाच्या विरोधक उभी असल्याचे दिसत आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव हे स्वतः वक्फ बोर्डबाबत कठोर कायदा करण्याची मागणी या व्हिडीओमध्ये करताना दिसत आहेत. जमिनी हडपण्यावर ते भाष्य करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला असून आता भाजपा आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. तसेच आता वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात उभे राहिलेल्या राजद पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लालूप्रसाद यादव यांचा व्हिडिओ २०१० सालचा असल्याची माहिती आहे. लालू यादव संसदेत म्हणत आहेत, “पाहा, एक अतिशय कडक कायदा करायला हवा. सर्व जमिनी हडपल्या गेल्या आहेत. असे नाही की तिथे शेतीची जमीन आहे. पाटण्यातील डाक बंगल्यातील सर्व मालमत्ता अपार्टमेंटमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. आम्ही तुमची दुरुस्ती मंजूर करू.” असे ते म्हणत आहेत.

हेही वाचा..

शुक्रिया मोदी जी ! भोपाळमध्ये मुस्लिम महिला मोदींच्या पाठीशी!

देशात मुलांना दत्तक घेण्याचा नवा विक्रम

वक्फ विधेयक राष्ट्रहितासाठी का आवश्यक

बिहारला आता आरोग्याचे वरदान

भाजपा आमदार आणि बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांनीही लालूप्रसाद यादव यांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “२०१० मध्ये लालूप्रसाद यादव स्वतः संसदेत वक्फबाबत कठोर कायदा करण्याबद्दल बोलले होते आणि वक्फ बोर्डाच्या नावाखाली जमिनीची मोठी लूट सुरू असल्याचे मान्य केले होते, परंतु आज त्याच लालूप्रसाद यादव यांचा पक्ष वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत आहे,” असे ट्वीट करत त्यांनी राजदची दुटप्पी भूमिका उघड केली आहे.

केंद्रीय मंत्री जितन राम मांझी म्हणाले की, “काही लोक वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहेत कारण हा कायदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणत आहे. तथापि, २०१० मध्ये लालूप्रसाद यादव यांनी कडक वक्फ कायदे करण्याबद्दल भाष्य केले होते. ‘इंडी’ आघाडीला लालूप्रसाद यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकण्याचे आणि सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ च्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करतो,” असे ते म्हणाले आहेत.

Exit mobile version